मुलांसाठी पोषक रेसिपीज
सेव द चिल्ड्रन या सामाजिक संस्थेने मुलांसाठी काम करताना केवळ त्यांच्या सामाजिक किंवा शैक्षणिक प्रगतीचा विचार केला नाही; तर त्यांच्या आरोग्याचा आणि त्याद्वारे त्यांच्या आहाराचा देखील विचार केला आहे. स्वस्त वाटेल आणि मुलांसाठी पोषक ठरेल अशा घटकांपासून तयार रेसिपीजचे ‘लो कॉस्ट न्यूट्रीशियस रेसिपी बुक’ या पुस्तकाचे प्रकाशन मास्टर शेफ सिझन टू विजेतीशिप्रा खन्ना यांच्या हस्ते झाले.

‘लो कॉस्टन्यूट्रीशियस रेसिपी बुक’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, ९ डिसें. २०१६ रोजी झाले.
मॉन्डेलिझ ‘शुभ आरंभ’ हा प्रकल्प ज्या आदिवासी भागात कार्यरत आहे, त्या भागातील स्त्रियांकडून त्यांच्या विविध पाककृती घेऊन हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत प्रकाशित झाले. या पुस्तकाचे विशेष हे की, या पुस्तकातील सर्व पाककृती त्या भागातील उत्पन्न रेषेच्या खाली असलेल्या स्त्रियांनी तयार केलेल्या आहेत आणि त्यामध्ये पारंपारिक घटकांच्या समावेशामुळे यामध्ये वेगळेपण आहे.

मागील अडीच वर्षात या पाककृती तयार करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पोषक आहाराच्या दृष्टीने आणि वर्गीकरणाद्वारे ५० पाककृती घेऊन हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.

संध्या कृष्णन स्टेट प्रोग्राम, महाराष्ट्र, जनरल मॅनेजर यांनी असे सांगितले की, “उत्पन्न रेषेच्या खाली असलेल्या या वर्गामध्ये पोषक आहाराविषयी जागरूकता निर्माण करणे हा या प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश आहे. या प्रकल्पाद्वारे आम्ही काही तरुणांना देखील प्रशिक्षण दिले आहे, जे स्वतः नेतृत्व घेऊन इतर लहान मुलांचे आणि तरुणाच्या पोषक आहाराविषयी आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करतील”.
मॉन्डेलिझ इंडिया फुड्स प्रायवेट लिमिटेड मॉन्डेलिझ इंटरनॅशनलचा एक भाग आहे. चॉकलेट, बिस्किट्स, पेय आणि कॅन्डी यामध्ये अग्रेसर ही कंपनी आहे. तसेच गेली ६० वर्षे चॉकलेटच्या उत्पादनामध्ये नावाजलेली कंपनी आहे. यांची डेरी मिल्क, सी.डी.एम. सील्क, सेलिब्रेशन्स, 5स्टार, पर्क, जेम्स ही उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. तर बोर्नव्हिटा, टँग ही पेये उपलब्ध आहेत. ओरिओ हे बिस्कीटाचे उत्पादन उपलब्ध आहे. सेव द चिल्ड्रन– भारतातील २० राज्यांमध्ये कार्यरत असलेली ही संस्था मुलांचे हक्क, त्यांचे शैक्षणिक, आरोग्यविषयक प्रश्न याविषयी कार्यरत आहे. तसेच आदिवासी भागातील मुलांच्या प्रश्नांसाठी देखील कार्यरत आहे.