‘इथेच टाका तंबू’ शूटिंगदरम्यान जोपासली कुकींगची आवड
आपल्या अभिनयानं अवघ्या इंडस्ट्रीचं लक्ष वेधून घेतलेल्या मधुरा देशपांडेला कुकिंगचीही आवड आहे. मालिकेच्या सेटवरच तिनं डोसे तयार करून सर्वांना खाऊ घातले.
मूळची पुण्याची असलेली मधुरा सध्या ‘इथेच टाका तंबू’ या झी युवा चॅनलवरील मालिकेत काम करत आहे. या मालिकेनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. तिनं झी मराठीवरील ‘असे हे कन्यादान’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. मधुरानं अभिनयासह विविध आवडी जपल्या आहेत. त्यात भरतनाट्यमसह पाककौशल्यापर्यंत बरंच काही आहे. ‘इथेच टाका तंबू’चं शूटिंग सुरू असतानाच तिनं थोडा वेळ काढून डोसे तयार केले. तिनं सेटवरच केलेल्या डोश्यांचं सर्वांनीच कौतुक केलं.