अभिजित खांडकेकर, मृण्मयी देशपांडे जर्मनीच्या दौ-यावर!
अभिजित आणि मृण्मयीचे जर्मनीत स्वागत करताना मूळ भारतीय.
जर्मनीत राहणाऱ्या मराठी माणसांना मराठी चित्रपट कलावंतांच्या उपस्थितीत पाहता यावा म्हणून शनिवारी (३१ जानेवारी) फ्रांकफुर्ट इथे ‘मामाच्या गावाला जाऊ या’ हा चित्रपट अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या उपस्थितीत दाखवण्यात येत आहे.
परदेशात राहणाऱ्या मराठी माणसांना मराठी चित्रपटांची ओढ नेहमीच असते. मराठी लोकांना परदेशात राहून मराठी चित्रपट पाहता यावा यासाठी अलीकडच्या काळात प्रयत्न देखील सुरु झालेत. जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांचा ‘अस्तु’ हा मराठी चित्रपट २०१४ साली फ्रांकफुर्ट येथे दाखविण्यात आला होता. रसिकांचा उत्तम प्रतिसाद या चित्रपटाला लाभला होता. ही परंपरा कायम ठेवत ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या मराठी चित्रपटाचे आयोजन ३१ जानेवारी २०१५ रोजी फ्रांकफुर्ट इथे करण्यात आले आहे. अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या उपस्थितीत ‘मामाच्या गावाला जाऊया’ हा मराठी चित्रपट फ्रांकफुर्टला प्रदर्शित होत आहे. यानंतर हा सिनेमा जर्मनीतील दोन शहरांमध्ये आणि नेदरलंड येथे दाखवला जाणार आहे.