आषाढी एकादशीनिमित्ताने ‘मन जाय पंढरीसी’ या ऑनलाइन लाइव इन कॉन्सर्टव्दारे तुम्ही घर बसल्या सहकुटूंब विठ्ठलभक्तीने ओथंबून जाणाऱ्या अजरामर भक्तीगीतांची अनुभूती घेऊ शकता. सुरेल गळ्याची गायिका सावनी रविंद्र यंदा पहिल्यांदाच ही ऑनलाइन लाइव कॉन्सर्ट करत आहे.
सावनी यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन लाइव कॉन्सर्ट करत आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने ‘मन जाय पंढरीसी’ या ऑनलाइन लाइव इन कॉन्सर्टव्दारे तुम्ही घर बसल्या सहकुटूंब विठ्ठलभक्तीने ओथंबून जाणाऱ्या अजरामर भक्तीगीतांची अनुभूती घेऊ शकता.
आषाढी एकदाशी १ जुलैला आहे. परंतू वर्क फॉर्म होम करणाऱ्या देशातल्या आणि विदेशातल्या रसिकांना बुधवारी दोन तासांची कॉन्सर्ट अनुभवायला आपल्या कामामुळे कदाचित शक्य होणार नाही. म्हणूनच शनिवारी २७ जूनला ही कॉन्सर्ट अगदी नाममात्र शुल्कासह ठेवण्यात आली आहे.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे कुठलेच कार्यक्रम गेले दोन तीन महिने होऊ शकलेले नाहीत. असे असले तरीही, तंत्रज्ञानामुळे या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाव्दारे अनेक कलाकार आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहिले आहेत. पण संपूर्ण कार्यक्रम पाहण्याची संधी रसिकांना मिळाली नाही. अजूनही प्रेक्षागृहात कार्यक्रम जरी आम्ही करू शकत नसलो तरीही आम्ही कलाकार एकत्र जमून ऑनलाइन कॉन्सर्ट करू शकतो. म्हणूनच, आषाढी एकादशीचं निमित्त साधून ही पहिली वहिली ऑनलाइन लाइव इन कॉन्सर्ट करायचे ठरवले. सुप्रसिध्द गीतकार वैभव जोशी या कार्यक्रमाचे निरूपण करणार आहेत. यंदा महाराष्ट्रतले अनेक भक्त वारीलाही सहभागी होऊ शकले नाही आहेत. पंढरपूरला दरवर्षी लोटणारा भक्तीचा महासागरही महाराष्ट्राला अनुभवता आला नाही आहे. कलाकार म्हणून आम्हीही हे सारं खूप मिस करतोय. त्यामूळे पांडुरंगा चरणी व्हर्च्युअली अशा पध्दतीने सेवा रूजू करण्याचा हा प्रयत्न आहे. -सावनी रविंद्र