राज्यभरातील उदयोन्मुख लेखकांना बहुमूल्य मार्गदर्शन
‘मानाचि’ अर्थात मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेतर्फे ‘अडव्हान्स्ड टीव्ही रायटिंग वर्कशॉप’ ७-८ आणि १५-१६ ऑक्टोबर रोजी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयोजित करण्यात आले होते. या अनोख्या कार्यशाळेत दिग्ग्ज लेखकांकडून बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ राज्यभरातून आलेल्या पन्नासहून अधिक उदयोन्मुख लेखकांनी घेतला.

राजेश देशपांडे, आशिष पाथरे, चिन्मय मांडलेकर, मनस्विनी लता रवींद्र यांनी संवाद कसे लिहावे, याविषयी शिबिरार्थींना बहिमोलाचे मार्गदर्शन केले. नॉन फिक्शनवर सचिन मोटे, सचिन गोस्वामी, महेंद्र कदम यांनी शीर्षक गीत अश्विनी शेंडे, मंदार चोळकर यांनी समजावून सांगितले. शिबिरार्थींसाठी नवा प्रकार असलेलय वेब सिरीजबद्दल विजू माने यांनी गुंतवले.

‘चला एक होऊया, उत्कर्ष साधूया’ या आपल्या ब्रीदवाक्याला जागत ‘मानाचि’ने नामवंतांकडून मार्गदर्शन मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने सहभागींनी मानाचिचे मन:पूर्वक आभार मानले.


