ट्रेलरने वाढवली उत्सुकता
नितीन केणी यांसारखे मात्तबर व्यक्तिमत्व ज्यांना मराठी सिनेमाची दूरदृष्टी आहेच, याच बरोबर मराठी सिनेमा मास आणि क्लासपर्यंत कसा पोहोचवायचा याची अगदी योग्य जाण असलेले नितीन केणी प्रस्तुत ‘मांजा’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला सिनेमागृहांत दाखल होत आहे.

किशोरवयीन मुलं मित्रांच्या प्रभावाने लगेच कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ शकतात. मात्र, जर त्यामध्ये एखाद्या चुकीच्या संगतीची भर पडली तर प्रश्न आणखी गंभीर व धोकादायक बनू शकतो याच गोष्टीवर भाष्य करणाऱ्या चित्रपट ‘मांजा’मध्ये अभिनेत्री अश्विनी भावे, सुमेध मुद्गलकर आणि रोहित फाळके प्रमुख भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहता, सुमेध मुद्गलकर म्हणजेच विकी हा खूप चतुर, एक्सट्रोव्हर्ट आतल्या गाठीचा म्हणावा असा मुलगा तर जयदीप म्हणजेच रोहित फाळके साधा सरळ आणि अबोल. अशा या अंतर्मुखी म्हणजे इन्ट्रोव्हर्ट जयदीपवर विकीचा कसा प्रभाव पडतो. या प्रभावात जयदीप काही चुकीच्या गोष्टी करतो का? जयदीपच्या आईची त्याच्यासाठी असलेली चिंता खरी ठरते का? जयदीपची आई त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून परिस्थितीशी दोन हात करते का? हे सर्व प्रश्न ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनात काहूर निर्माण करतात आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिघेला नेतात.
विकी-जयदीप-त्याची आई या त्रिकोणातला हा मनोविकृतीवर आधारित लपंडाव कसा रंगतो ते चित्रपट पाहूनच कळेल. बॉलीवूड क्षेत्रात कार्यरत असलेले तंत्रज्ञ – फसाहत खान, अलोक डे, बेयलॉन फॉंसेका, चारूश्री रॉय, शैल प्रितेश, अनुराग सैकिया, प्रद्युम्न कुमार स्वैन, लॉंजिनस फर्नांडिस आणि अपूर्व अरोरा, डेंझिल स्मिथ, शिवानी टांकसाळे, मोहन कपूर या कलाकारांचे मांजा या चित्रपटात मोलाचे योगदान आहे.
त्रिलोक मल्होत्रा आणि के आर हरीश निर्मित हा चित्रपट २१ जुलैला जागतिक पातळीवर प्रदर्शित होणार आहे. नितीन केणी आणि मनीष विशिष्ट यांच्या एमएफडीसी या कंपनी अंतर्गत ‘मांजा’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.