समृद्धा पुरेकर यांच्या कलाकृतींचे १७ जानेवारीपासून चित्रप्रदर्शन
कोल्हापूरच्या समकालीन चित्रकार समृद्धा पुरेकर यांनी अलीकडच्या काळात रंगभाषेत रेखाटलेल्या ‘आठवणी कोल्हापूरच्या’ या कलाकृतींचे प्रदर्शन १७ जानेवारीपासून वरळीतील नेहरू सेंटरच्या कलादालनात सुरु होत आहे. २३ जानेवारीपर्यंत सुरु राहणाऱ्या प्रदर्शनातील कलाकृती चित्ररसिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत
निःशुल्क बघता येणार आहेत.


हा आठव त्यांनी अत्यंत साधेपणाने कोरला असला तरी ही चित्रमालिका कोल्हापूरचा एक नयनरम्य निबंधासारखा आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाण्यातील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कुलच्या प्राचार्य रेवती श्रीनिवासन आणि नेहरू सेंटरच्या सहायक संचालक नीना रेगे यांच्या हस्ते १७ जानेवारीला होणार आहे.
समृद्ध या श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कुलमध्ये व्हिज्युअल आर्ट प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. अनेक समूह चित्र प्रदर्शनांमध्ये समृद्धा यांनी सहभाग नोंदवला असून, त्यांच्या रंगलेखनाची दखल कलाप्रेमींनी घेतली आहे. अनेक पोर्ट्रेट कार्यशाळेत त्या सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या चित्रांचे राज्यस्तरीय चित्र प्रदर्शनांमध्ये झळकली आहेत. कॅमलिन ऑल इंडिया एक्सिब्युशन, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटीच्या ऍन्युअल एक्सिब्युशनमध्ये त्यांचा सहभाग होता. ‘आठवणी कोल्हापूरच्या’ हे त्यांच्या कलाकृतींचे पहिले एकल प्रदर्शन आहे. चित्ररसिकांचे या प्रदर्शनाला प्रोत्साहन मिळेल, एवढी ताकत त्यांच्या रंगलेखनात आहे.