मिस, मिसेस आणि टिन टिआरा स्पर्धेचा देखणा सोहळा
ठाण्यातील मेमरी मेकर्स कंपनीतर्फे आयोजित मिस, मिसेस एन्ड टिन टिआरा सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी सोहळा शानदारपणे संपन्न झाला. मिस टिआरा इंडिया ग्लोबलसाठी निशिता पुरंदरे (नवी मुंबई), मिस टिआरा इंडिया इंटरनॅशनलसाठी अरूणाचल प्रदेशहून आलेली चुम दरांग हिची निवड झाली. मिस टिआरा कॉन्टीनंन्टसाठी मुंबईची छेरील चार्ल्स हिची निवड झाली.
विवाहित महिलांसाठी असलेल्या गटातून मिसेस टिआरा इंडिया ग्लोबलसाठी ठाण्याची आरती शिंदे, मिसेस टिआरा इंडिया इंटरनॅशनलसाठी ठाण्यातील नुतन जयंत यांची, तर जबलपूरहून आलेल्या प्राची देशपांडे यांना मिसेस टिआरा इंडिया कॉन्टीनेंन्टचा मुकूट मिळाला. या गटात तिसरा क्रमांक अन्नू आनंद (झारखंड) व चौथा क्रमांक अनुजा राव पाटील यांचा आला.
यावर्षी पासून टिनेएजर गटासाठीदेखील स्पर्धा झाली. मिस टिआरा इंडिया टिन इंटरनॅशनलसाठी दिल्लीची सृष्टी कौर, मिस टिआरा इंडीया ग्लोबलसाठी पनवेलची वैष्णवी कांबळे, मिस टिआरा इंडिया कॉन्टीनेन्टसाठी नवी मुंबईची रितीका घाडगे हिची निवड झाली.
गतवर्षीपासून (२०१६) मिस एन्ड मिसेस टिआरा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मागील वर्षी निवड झालेल्या सौंदर्यवतींपैकी काही जणांची निवड मिस आणि मिसेस हेरीटेज सौंदर्य स्पर्धा तसेच मिसेस टॉप ऑफ द वर्ल्ड स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेतून निवडलेल्या स्पर्धकाना पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी पात्र धरण्यात येते. विविध सौंदर्य स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले ऋषीकेश मिरजकर यानी मागील वर्षीच्या टिआरा सौंदर्य स्पर्धेच्या स्पर्धकाना प्रशिक्षण दिले होते. या वर्षी देखील स्पर्धकाना त्यानीच मार्गदर्शन केले. देशभरातून २८० जणींनी या स्पर्धेसाठी नाव नोंदवले होते. अंतिम फेरीत त्यापैकी २८ जणी पोचल्या होत्या. स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरात संपन्न झाली. मयुरेश पेम व सिमरन आहुजा यानी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर ज्युरी म्हणून उद्योगपती संतोष सबकोटा, फिटनेस तज्ज्ञ लीना मोगरे, रेकी मास्टर डॉ. जयंती जांगियानी, मिसेस युनिव्हर्ससाठी भारताचे प्रतिनिधीत्व केलेली मॉडेल मानसी मोघे, फॅशन डिझायनर विश्वास कपूर यानी काम पाहिले.
क्रिएटिव्ह आर्ट डायरेक्टर भऱत दाभोळकर, कलाकार किशोर प्रधान, डॉ विशेष नायक, मेकअप आर्टीस्ट आशा व समीर हरीहरन, रेखा श्रीगर्ज, विक्रम गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते. मेमरी मेकर्सच्या संचालक रेखा मिरजकर यानी पाहुण्यांचे स्वागत केले.