वास्तववादी चित्रीकरणासाठी टीम फर्ग्युसन कॉलेज रोडवर
प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित आणि पुनित बालन निर्मित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील एका दृश्याचे वास्तववादी चित्रण करण्यासाठी कलाकार फर्ग्युसन कॉलेज रोडजवळील उदय तरुण मंडळात पोहोचताच उपस्थितांमध्ये खूप उत्सुकता पसरली होती.

प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित आणि पुनित बालन निर्मित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील एका दृश्याचे वास्तववादी चित्रण करण्यासाठी तेथे उपेंद्र लिमये, मिलिंद दास्ताने, सुरेश विश्वकर्मा, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, क्षितीश दाते, शरद जाधव, श्रीपाद चव्हाण, महेश लिमये आणि प्रवीण तरडे हे कलाकार उपस्थित होते. राजकारणी, पोलीस, गुन्हेगारांच्या वेशभूषेतील या कलाकारांना बघून उपस्थितांमध्ये खूप उत्सुकता पसरली होती. आणि त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि पोलिसांच्या वेशातील कलाकार स्वतः रस्त्यावर उतरले व तेथील स्वयंसेवकांना मदत करू लागले. पोलिसांच्या वेशातील आपल्या लाडक्या कलाकारांना गर्दी नियंत्रित करताना बघून पुणेकरदेखील सुखावले.