१६ ऑक्टोबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर
नेहमीच नवं काहीतरी प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करणारा मराठीतील आघाडीचा सिनेदिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ या सिनेमातून तरूणाईचा दृष्टीकोन रंजकपणे मांडला. या धमाल चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर रविवार १६ ऑक्टोबर दुपारी १२वा. व सायंकाळी ६ वा. झी टॅाकीजवर होणार आहे.
‘मुंबई-पुणे-मुंबई २ लग्नाला यायचंच’ या चित्रपटाची कथा गौतम प्रधान (स्वप्नील जोशी) आणि गौरी देशपांडे (मुक्ता बर्वे) यांच्या लग्नाची म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या लग्नाची. पण या दोघांच्या लग्नाचे दिवस जवळ येत असताना कथानकात अचानक एक ट्विस्ट येतो. हा ट्विस्ट काय आहे? याची रंजक काहणी म्हणजे ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ हा सिनेमा.
स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, प्रशांत दामले, मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, आसावरी जोशी, श्रॄती मराठे आणि सुहास जोशी या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ या सिनेमाचा आस्वाद येत्या रविवारी १६ ऑक्टोबर दुपारी १२ वा. व सायंकाळी ६ वा. झी टॅाकीजवर अवश्य घ्या.