१८ मे रोजी ‘महासत्ता २०३५’ येतोय चित्रपटगृहांत
‘महासत्ता २०३५’ या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारताहेत नागेश भोसले. त्यांच्या अभिनयाच्या ताकदीमुळे चित्रपटातील नायकाची गुणवत्ता प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येईल. ते आबासाहेब नामक राजकारण्यांच्या भूमिकेत असून चित्रपटाचा नायक रोहितची भूमिका रामप्रभू नकाते यांनी साकारली आहे.

नागेश भोसले यांनी याआधीही खलनायकाच्या भूमिका साकारल्या असल्या तरी ‘महासत्ता २०३५’ मधील त्यांची भूमिका आजपर्यंत केलेल्या खलनायकापेक्षा वेगळी आहे. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेलाही आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची थाप मिळाली आहे. हा चित्रपट तब्बल ४९ आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून गौरविला गेलाय व त्याने अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहे.
अशा या बहुपुरस्कारप्राप्त चित्रपटातून नागेश भोसले यांच्या अभिनची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. हा चित्रपट येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.