खऱ्या पत्रकारितेचा शोध घेणारा चित्रपट
पत्रकारितेवर भाष्य करणारा ‘नागरिक’ या आशयसंपन्न चित्रपटाचा स्टार प्रवाहवर येत्या १४ मे रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी बऱ्याच वर्षांनी केलेली मुख्य भूमिका हेही या चित्रपटाचं ठळक वैशिष्ट्य आहे. जयप्रद देसाई दिग्दर्शित या चित्रपटाचा राज्य पुरस्कारांसह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरव झाला आहे. दिग्गज कलावंतांची अभिनय जुगलबंदी आणि सकस आशय असलेल्या ‘नागरिक’चा १४ मे रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर होणारा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आवर्जून पाहण्यासारखा आहे..