‘लेक माझी लाडकी’त नात्यांतील भावनिक गुंतागुंत
‘स्टार प्रवाह’च्या ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेतील नायिका असलेली सानिका प्रेक्षकप्रिय झाली असून, तिला चाहत्यांची उत्तुंग दाद मिळत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या नक्षत्रा मेढेकरला तिच्या फॅन्सनी भेटून तिच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.


‘खलनायक किंवा ग्रे शेड साकारलेल्या कलाकारांवर अनेकदा प्रेक्षक राग व्यक्त करतात. मला मात्र तसा अनुभव आला नाही. उलट, माझी भूमिका ग्रे असूनही प्रेक्षकांना आवडतेय, हे पाहून मला फार छान वाटलं,’ असं नक्षत्रानं सांगितलं.
भरकटत चाललेल्या आपल्या नवऱ्याला म्हणजेच साकेतला पुन्हा संसाराकडे आकर्षित करायला, मालिकेमध्ये सानिकाने मॉडर्न परिधान केलेले दिसत आहे. भावनिक नात्यांतील सुरेख गुंतागुंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल स्टार प्रवाहाच्या ‘लेक माझी लाडकी’ मध्ये सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता.