स्टार प्रवाहवर ८ नोव्हेंबरला म्युझिकल एपिसोड
अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘नकुशी… तरीही हवीहवीशी’ या स्टार प्रवाहवरील मालिकेचा म्युझिकल एपिसोड मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता दाखवला जाणार आहे.

नयनरम्य कास पठार आणि वाईच्या परिसरात या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. नकुशीचं बहरणारं प्रेम आणि नेत्रसुखद निसर्ग यांचा मिलाफ या गाण्यात जुळून आला आहे. नकुशीचा प्रेमाचा हळूवार अनुभव, तिचं प्रेम यशस्वी होणार का, नकोशी असलेली नकुशी हवीहवीशी होणार का, अशा साऱ्या प्रश्नांसाठी हा म्युझिकल एपिसोड पहायलाच हवा.