रवींद्र नाट्य मंदिरमध्ये रंगला उपक्रम
नालंदा नृत्य कला महाविद्यालायाने ‘संतगाथा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. भारताला मोठी अशी संत परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील काही संताची माहिती या कार्यक्रमामध्ये नृत्याद्वारे दिली गेली. हा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे झाला.

नालंदा कला महाविद्यालयाच्या विद्यर्थ्यांनी भारतातील संतांची शिकवण आपल्या नृत्याच्या माध्यमातून सादर केली. त्यामध्ये सर्व जनसमुदायास एकसमान मानणारे संत कबीर, गणिकेची मुलगी असूनसुद्धा कृष्णावर अविरत प्रेम करून त्याच्यासाठी अभंग म्हणणारी संत कान्होपात्रा, कृष्णाच्या प्रेमामध्ये लीन असणारी संत मीराबाई, राम नावाचं खरे पवित्र्य समजावून सांगणारे संत तुलसीदास, आयुष्याचा खरा अर्थ सागणारे संत रहीम आदींवर आधारित नृत्याचा समावेश होता.
नालंदा नृत्य कला महाविद्यालयामधील विद्यार्थी केवळ नृत्य नव्हे तर आपल्या आयुष्यालादेखील एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघत आहे. नालंदासारखी महाविद्यालये निर्माण होणे गरजेच आहे. माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत आहेत, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यावेळी म्हणाले.
नालंदा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भारतीय नृत्य शैलींद्वारे संतांची इतकी चांगली ओळख करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कनक रेळे यांनी आभार व्यक्त केले.