६वे एन.ई.एस राष्ट्रीय विज्ञान महोत्सव सुरु
एन.ई.एस.इंटरनॅशनल स्कूल मुंबई आणि दक्षिण आशियाई आय.बी शाळा असोसिएशन मिळून नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्हि रामन आणि विज्ञान दिनानिम्मित (२८ फेब्रु) एन.ई.एस. राष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजित केला आहे. गेल्या ५ वर्षापासून हा विज्ञान महोत्सव होत आहे. या वर्षी विज्ञान महोत्सवाची सुरुवात २५ फेब्रुवारी रोजी झाली. प्रयोग, यंत्रमानव, बायो-ज्वेलरी, नृत्य स्पर्धा, स्पेस सायन्स आधारित पथनाट्ये या महोत्सवात सादर झाली.

शिक्षक मार्गदर्शन, रासायनिक मनोरंजन, लाइव्ह शो, भौतिकशास्त्र, विज्ञान शुद्धलेखन स्पर्धा इत्यादि एन.ई.एस विज्ञान महोत्सवात होणार आहे. डी.ए.व्हि इंटरनॅशनल स्कूल, गोल्डक्रेस्ट इंटरनॅशनल स्कूल, ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल, अजमेरा ग्लोबल स्कूल, सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल, आदित्य बिर्ला अकादमी, जमनाबाई इंटरनॅशनल स्कूल आणखी अजून अधिक शाळा देशाच्या इतर भागांमधून सहभाग घेतला होता.
