वरळीत ४ मे रोजी ‘ओयासिस… म्युझिक इन समर’
पंचम निषाद या संस्थेच्या संकल्पनेतुन ‘ओयासिस.. म्युझिक इन समर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, या कार्यक्रमाच्या संगीतप्रेमींना उन्हाळ्यात सांगीतिक गारवा सुख देणार आहे. ही मैफल ४ मे २०१७ रोजी (गुरुवारी), संध्याकाळी सहा वाजल्यापासून वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात रंगणार आहे.
इंगा हेल्थ फाऊंडेशन या आर्थिकदृष्ट्या अस्थिर कुटुंबांतील तसेच, एकूणच गरीब कुटुंबांतील मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने निधीवृद्धीसाठी `ओयासिस.. म्युझिक इन समर` या नावाची भारतीय शास्त्रीयसंगिताची मैफल आयोजित केली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून श्रोत्यांना गिटारवादक दीपक क्षीरसागर, प्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी आणि संतूरवादक निलाद्री कुमार यांच्या संगीतकलेचा नजराणा अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
कलाकारांची माहिती
दीपक श्रीरसागर (गिटारवादन) – दीपक क्षीरसागर हे ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवरील अ श्रेणीचे कलाकार आहेत. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षी आपल्या सांगीतिक प्रवासाला सुरूवात केली. त्यांचे गुरू पंडीत बी .एन. क्षीरसागर आणि पंडीत सतीशखानवलकर यांच्या अत्यंत कठोर व शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळे दीपक यांची आजच्या पिढीतील सर्वांत गुणवंत गिटारवादक म्हणून ओळख निर्माण झाली. दीपक यांच्या उच्च कल्पकतेमुळे आणि अभ्यासू वृत्तीमुळेत्यांचा सांगीतिक दृष्टीकोन बदलण्यास त्यांना मदत झाली आणि त्यांनी गिटारवादन कलेमध्ये अनेक नवनवीन तंत्रे स्वतः विकसित केली. तसेच, त्यांची स्वतःची ओळख सांगणारी स्वतंत्र स्टाईल यातूनच निर्माणझाली व परिणामी, भारतीय शास्त्रीय संगीताच्या अवकाशात त्यांचे स्वतंत्र अस्तित्वही भक्कम झाले.
जयतीर्थ मेवुंडी (गायन) – जयतीर्थ यांचे सुरूवातीचे सांगीतिक शिक्षण पं. अर्जुनसा नाकोड यांच्याकडे झाले तर, त्यांचा पुढचा सांगीतिक विकास हा पं. श्रीपती पाडेगार यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. सुमधूर गळ्याचे जयतीर्थ आज अत्यंत कुशलगायक असून हिंदुस्तानी शास्त्रीय संगिताच्या तरुण पिढीतल्या सर्वांत वरच्या क्रमांकावरील गायकांमध्ये त्यांचे स्थान आहे. भारतीय शास्त्रीय संगितापासून उपशास्त्रीय आणि डेव्होशनल संगितापर्यंतच्या त्यांच्या सर्वप्रकारच्या मैफलींतून जगभरातल्या श्रोतृवर्गाला त्यांनी आजवर अनेकदा मंत्रमुग्ध केले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या हस्ते जयतीर्थ यांना संगितातील `यंग माएस्ट्रो` हा पुरस्कार देण्यात आला. तसेच, त्यांना आदित्य बिर्ला कला कीरण पुरस्कार व पंडीत जसराज गौरव पुरस्कारानेहीसन्मानित करण्यात आले आहे. जयतीर्थ यांना सध्याच्या भारतीय संगितातील सर्वांत शक्तीशाली संगीतकार म्हणून प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी गौरविले आहे. तसेच, माननीय लता मंगेशकर यांनीहीत्यांचा उल्लेख अतिमधूर गायक असा केला आहे.
निलाद्री कुमार (सतारवादन) – सतारवादक कार्तिक कुमार यांच्या घरी जन्माला आलेला निलाद्री हा लहानगा आज जगातील सर्वांत कौशल्यपूर्ण, कल्पक आणि प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक असल्याचे म्ह़टले जाते. निलाद्री यांनी निश्चितपणे एकतरुण सतारवादक म्हणून या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवला आहे. भारतीय शास्त्रीय संगिताला जागतिक संगीतक्षेत्रात महत्वाचे स्थान देऊन निलाद्री यांनी त्यांच्या संगीतकलेच्या कक्षा जगभर रुंदावल्या आहेत.त्यांनी त्यांच्या सतारीमध्ये असे काही बदल केले की, ज्यामुळे या वाद्यातून पाश्चिमात्य संगितातील सूर छेडता येऊ लागले आहेत. या नव्या वाद्याला त्यांनी झिटार असे नाव दिले आहे. अनेक पुरस्कारांनी गौरवण्यातआलेले निलाद्री हे आज श्रोते तसेच, आयोजकांची अग्रस्थानी निवड बनले आहेत.
इंगा फाऊंडेशनविषयी
इंगा हेल्थ फाऊंडेशन या नोंदणीकृत संस्थेने वैद्यकीय जगतात काम करण्याचा वेगळा आणि आव्हानात्मक मार्ग निवडला आहे. दुर्दैवाने आज भारतातल्या ग्रामीण व नागरी भागातली बहुतांश मुले ही चेहऱ्याच्या किंवाशरिराच्या अन्य भागांतील अपंगत्व घेऊन जन्माला येतात. चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये समस्या असलेल्या या मुलांवर शस्त्रक्रिया केल्यानंत किंवा अन्य वैद्यकीय उपचारांनी त्यांना चांगला चेहरा व सामान्य जीवन देतायेणे शक्य असते. असे असले तरीही, अशा प्रकारचे वैद्यकीय उपचार हे या मुलांच्या गरीब पालकांच्या आवाक्याबाहेरचे असतात. इंगा फाऊंडेशनने हे काम एक मोठे आव्हान म्हणून हाती घेतले असून अत्यंत कुशाग्रडॉक्टरांच्या हातून या मुलांच्या शस्त्रक्रिया व उपचार करून घेऊन त्यांना पुन्हा सर्वसामान्यांसारखा चेहरा मिळवून देण्यात इंगा फाऊंडेशनने मदत केली आहे. या अत्यंत महत्वाच्या कार्यासाठी २००० सालापासून हीसंस्था अविरत प्रयत्न करीत आहे आणि आजवर जवळजवळ ५ हजारांहून अधिक मुलांना या संस्थेने मदत केली आहे.
डोनर्ससाठी १००० रुपये, ५०० रुपये, ३०० रुपये आणि २०० रुपयांची तिकीटे १ मे २०१७ पासून उपलब्ध होणार आहेत. `ओयासिस.. म्युझिक इन समर` या कार्यक्रमाची तिकीटे www.bookmyshow.com या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.