सुरेश आणि पद्मा वाडकर यांच्या हस्ते सिनेमाचा मुहूर्त
एका आगामी चित्रपटाचा मुहूर्त ‘राजना साजणा’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगने करण्यात आला असून, या गाण्याला
सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर या दाम्पत्याने स्वरसाज चढवला आहे.

या गाण्याविषयी बोलताना सुरेश वाडकर यांनी अनेक वर्षांनी असे सुमधुर गाणे गाण्याची संधी मला लाभली असल्याचे सांगून , ते वारंवार गाण्याचा मोह होत असल्याचे ते म्हणाले.
या गाण्याचे संगीत दिग्दर्शक रवी त्रिपाठी हा सुरेश वाडकर यांचा शिष्य असल्यामुळे, माझ्या घराण्याची झलक या गाण्यांमधून दिसून येत असल्याचे सुरेश वाडकर यांनी आवर्जून सांगितले.

‘राजना साजणा’ या गाण्याबरोबरच आणखी ५ गाणी या सिनेमात असून, आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, वैशाली म्हाडे यांसारख्या गायकांचा आवाज या गाण्यांना लाभणार आहे. चित्रपटाचे शीर्षक आणि कलाकारांची नावे तुर्तास गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून, लवकरच त्याची अधिकृत माहिती लोकांसमोर येईल, अशी माहिती निर्माते संदीप इंगळे यांनी दिली.