डहाणूत चित्रकलेचे निवासी शिबीर
रंगलेखनातून अनेक वर्ष निसर्गचित्रण करणारे प्रख्यात चित्रकार शरद तावडे त्यांच्या अनुभवाची गुरुकिल्ली निवासी कार्यशाळेतून नवोदित रंगलेखकांसोबत शेअर करणार आहेत, तेही डहाणूतील निसर्गाच्या सानिध्यात!


दिनांक २०, २१, २२, २३ ऑक्टोबर या कालावधीत निसर्गचित्रणाची निवासी कार्यशाळा (residential workshop) मुंबईजवळील डहाणू येथे आयोजित केली आहे. निसर्गाच्या सानिध्यात निसर्गचित्रणाचा अभ्यास.

या शिबिरात रंग, रेषा, आकार यांच्या नेमकेपणाचं महत्व, छायाभेद, रंग व छटा (hues and values) यांचे आपापसातले नाते, यतार्थदर्शन (perspective), चित्र रचना (composition) व त्याचे महत्व अधोरेखित केले जाईल. तसेच निसर्गचित्रणाच्या तीन पायऱ्या, प्रथम पेन्सिलमधील रेखाटन (pencil rendering) मग एकल रंगातील चित्रण (single colour painting) मग विविध रंगातील चित्रण (malty colour painting) यांचा प्रात्यक्षिकांसह सराव करून घेण्यात येईल.
शिबिरात माध्यम म्हणून जलरंगांचा (water colours) वापर केला जाईल. निसर्गचित्रण करू इच्छिणाऱ्या नवीन होतकरू, हौशी, तसंच ज्यांचा चित्रकलेच्या अभ्यासामध्ये खंड पडला आहे अशा सरावांसाठी ही एक नामी संधी आहे. अत्यंत माफक शुल्कात चार दिवसांच्या शिबिरात राहण्याच्या, खाण्याच्या व काही प्रमाणात प्रवासाच्या सोयींसह सर्व आवश्यक कालसाहित्य (ब्रशेस शिवाय) आयोजकांकडून पुरवले जाणार आहे.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी
भ्रमणध्वनी क्रमांक 9869032698 अथवा
tawadesharad@gmail.com वर संपर्क साधावा