कोव्हिड 19 च्या आरोग्य समस्येमुळे यंदा ‘बोलावा विठ्ठल’ ही मैफल दरवर्षीप्रमाणे लाईव्ह प्रकारात प्रत्यक्ष सभागृहात आयोजित करणे अशक्य आहे. त्यामुळे, आजवरच्या इतिहासात प्रथमच, पंचम निषाद आयोजित बोलावा विठ्ठल मैफलीचे आयोजन बूक माय शो या मनोरंजन क्षेत्रातल्या जगप्रसिद्ध डिजिटल व्यासपिठावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, 1 जुलै 2020 (आषाढी एकादशी) रोजी रात्री 8.30 वाजल्यापासून ही मैफल बूक माय शो या डिजिटल व्यासपिठावर प्रसारित होणार आहे.
भक्ती आणि अध्यात्म हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. गेली अनेक शतके भजने, कीर्तन, शबद आणि कव्वाली अशा विविध सांगीतिक आणि साहीत्यिक प्रकारांमधून भक्ती आणि अध्यात्म हातात हात घालून व्यक्त झाले आहेत. अभंग हा लोकभक्तीसंगिताचा आणखी एक प्राचीन आणि सुंदर प्रकार आहे.
‘बोलावा विठ्ठल’ ही आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारी मैफल अभंग या पश्चिम भारतातल्या लोकभक्ती संगीत प्रकारावर आधारलेली सुरेल कलाकृती आहे. 2005 साली सुरू झालेली ‘बोलावा विठ्ठल’ ही मैफल गेली 15 वर्षे अत्यंत यशस्वीपणे अनेक अजरामर कलाकारांच्या साथीने आणि रसिक श्रोत्यांच्या निस्सीम प्रेमाने आजही सुरू आहे. आज, भारतीय भक्तीसंगिताच्या बाबतीत जागतिक व्यासपिठावर बोलावा विठ्ठल ही ब्रॅण्ड इव्हेण्ट बनलेली मैफल आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने, यंदा पंचम निषादच्या ‘बोलावा विठ्ठल’मध्ये रंजनी-गायत्री या भगिनी आणि प्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी हे तीन लोकप्रिय कलाकार अभंगवाणीचा सुरेल आविष्कार साकारणार आहेत.
बोलावा विठ्ठल ही मैफल सुरू केल्यापासूनच या इव्हेण्टवर भरपूर प्रेम केलेल्या रसिक श्रोत्यांसाठी ही मैफल म्हणजे वार्षिक तीर्थाटनच आहे. जागतिक आरोग्य आणीबाणीच्या काळात, बोलावा विठ्ठल ही वार्षिक मैफल आम्ही यंदा डिजिटल स्वरूपात रसिक श्रोत्यांपुढे घेऊन येत आहोत. या डिजिटल मैफलीत यापूर्वीच्या मैफलींतील अविस्मरणीय परफॉर्मन्सेस दाखवण्यात येणार असून आषाढीनिमित्त, भारतात व जगभरात वसलेल्या आमच्या रसिक श्रोत्यांना संगितानंद देणे हा यामागचा उद्देश आहे.’’ -शशी व्यास, पंचम निषादचे संस्थापक व संचालक
तिकीटे – 200 रुपये (+ जीएसटी लागू).
तिकीटे बूक करण्यासाठीची लिंक https://in.bookmyshow.com/events/bolava-vitthal-an-evening-of-abhangs/ET00133580