फॅमिली, फुड, फेस्टीव्हल विषयावर छायाचित्र पाठवा
कॅमेऱ्याच्या माध्यमातून कलात्मक आणि वेगळा दृष्टीकोन ठेवून फोटो काढणाऱ्या हौशी तसेच व्यवसाईक फोटोग्राफर्ससाठी फोटोफ्राय फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे.
सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली असुन विजेत्या स्पर्धकांच्या फोटोग्राफीचे प्रदर्शन आणि बक्षीस समारंभ पिरामल आर्ट गॅलरी, नरीमन पाॅईंट, मुंबई येथे होणार आहे.
विशेष म्हणजे महिलांनी फोटोग्राफी व्यवसायात पुढे यावे म्हणून एका विजेत्या महिला फोटोग्राफरसाठी नाट्यसिने अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांनी बक्षीस जाहीर केलेले असून याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित रहाणार आहेत.
स्पर्धेचे विषय : 1) फॅमीली 2) फुड 3) फेस्टीव्हल.
प्रत्येक विषयांवर जास्तीत जास्त पाच प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून आपल्याकडील इतर विषयांवर असलेले फोटो प्रदर्शनात प्रदर्शित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फोटो apacinstitute@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायचे असून, त्याची साईज 12×18 ( 300 dpi ) असणे आवश्यक आहे.
प्रदर्शनात प्रदर्शीत झालेले फोटो आपल्याला फोटो फेस्टीव्हलनंतर परत ममिळतील.
अधीक माहीती, अटी आणि नियम यासाठी अर्चना देशपांडे जोशी यांना 8452960488, 9324250371 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.