दोन भावांनी सहयोग करून शोधला पर्याय
कालबाह्य आणि झिजलेल्या पाइपलाइनमुळे मौल्यवान पाणी वाया जात आहे आणि अचूक पाहणी व्यवस्थेच्या अभावामुळे हा प्रश्न अधिक गंभीर हो आहे. या पाईप लाईनवर नजर ठेवणारा ‘रोबो’ दोन भावंडांनी शोधला आहे.
विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीतील (व्हीईएसआयटी) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असलेला विद्यार्थी रोहित कश्यप आणि सोमय्या कॉलेजमधील विद्यार्थी राहुल कश्यप यांनी इन-पाइप पाहणी करण्यासाठी सेपर – सेमी-ऑटोनॉमस पाइपलाइन एक्स्प्लोरेशन रोबो तयार केला आहे.


‘सेपर म्हणजे आधुनिक पाइपलाइन व्यवस्थेची स्थिती तपासण्यासाठी व नोंदवण्यासाठी शोधलेला परिपूर्ण व किफायतशीर उपाय आहे. ढगाळ स्थितीमध्ये इमेजेस घेण्याच्या आणि यूएव्हीने समाविष्ट करता येईल अशा अंतराच्या बाबतीत, पाइपलाइनची पाहणी करण्याच्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा आहेत. तसेच, या तंत्रज्ञानांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. नवी तंत्रज्ञान गॅजेट आणि मोठ्या दबावाखाली काम करण्याची सिद्ध झालेली क्षमता असलेला सेपर सध्याच्या कालबाह्य तंत्रज्ञानाला तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय ठरू शकतो,” असे व्हीईएसआयटीतील रोहित कश्यप याने स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या या प्रकल्पामध्ये व्हीईएसआयटीचे प्रा. अभिजीत शेटे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प विकासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यात मोलाचे मार्गदर्शन केले. सेपरने नियंतर या तांत्रिक ज्ञान वापरून प्रत्यक्ष जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या नॅशनल इन्स्ट्रुमेंट्सने आयोजित केलेल्या वार्षिक स्टुडंट डिझाइन काँटेस्टच्या सेमी-फायनल फेरीमध्ये प्रवेश केला आहे.