नाट्य संमेलनाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरु 

५ नोव्हेम्बरपर्यंत नावे सुचविण्याचे आवाहन 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने २०१७मध्ये आयोजित होणाऱ्या ९७व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्याचे आवाहन नाट्य परिषदेने सदस्यांना केले आहे. ५ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजेपर्यंत सूचनापत्र पोहोचतील अशा बेताने ही नावे पाठवायची आहेत. 
सदस्यांनी आपले सूचनापत्र सूचित व्यक्तीच्या लेखी संमतीसह आणि सूचक-अनुमोदक यांच्या स्वाक्षरीसह परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, मनमाला टॅंक रोड, माहीम, मुंबई ४०० ०१६ येथील कार्यालयात ५ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सीलबंद लखोट्यात सादर करावे, त्यानंतर आलेल्या सुचनपत्रांचा विचार केला जाणार नाही, असे नाट्य परिषदेने कळविले आहे. 
सूचक, अनुमोदक व सूचित व्यक्ती या नियामक मंडळाच्या सदस्य असता काम नयेत. मात्र ते परिषदेचे आजीव सदस्य असले पाहिजे, याची दक्षता सभासदांनी घ्यावी असेही परिषदेने दिलेल्या प्रसिद्धीपात्रात नमूद केले आहे. 

Most Recent Entries

  • ‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात   

    ‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात   

सर्व अधिकार राखीव © २०२३ रंगमैत्र