प्रमोद पेंडसे यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन
सुप्रसिध्द रंगलेखक प्रमोद पेंडसे यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘द डिव्हाईन दर्शन’ हे प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये मांडण्यात येणार आहे. वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये २५ ऑक्टोबरपासून सुरु होत असून, ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांसाठी विनामुल्य खुलं राहील.


सगुणाचेनी आधारे। निर्गुण घ्यावे निर्धारे।। या संत उक्तीप्रमाणे प्रथम सगुण उपासना, त्यानंतर मंत्र उपासना आणि सरते शेवटी निर्गुण निराकार प्रकाश रुपाची अनुभूती असा प्रवास सांगितलेला आहे. त्या प्रमाणे प्रतिमा पूजन, मंत्र-स्त्रोत्र पूजन आणि यंत्र पूजन असे वेगवेगळे विधी ज्याच्या त्याच्या आवडी प्रमाणे अनुसरले जातात.
बालपानात रंगलेखन लेखन करणारे चित्रकार प्रमोद पेंडसे यांनी ३९ वर्षं आर्किटेक्चर इंटेरीयर डिझाईन या क्षेत्रात उत्तम यश संपादन केल्यानंतर आपल्या मुळ आवडीच्या कलाप्रेमाचा ध्यास घेऊन चित्रकलेच्या माध्यमातून आपले विचार मांडण्यास सुरुवात केली. सदर प्रदर्शन ही त्याचीच दृश्य परिणीती आहे.
सदर प्रदर्शनात मांडलेल्या चित्रांव्दारे भारतीय कला पध्दतीपमाणे प्रतिमादर्शन, मंत्र, स्त्रोत्र आणि यंत्र कला यांचे संमिलन करून अत्यंत आकर्षक रंगसंगती आणि नियमबद्ध कलाकृतींची निर्मिती केलेली आहे.
सदर प्रदर्शनात भगवान माधवाचं नटराज स्वरूप, माता अन्नपूर्णा देवी, माता गायत्री देवी, माता महालक्ष्मी देवी, माता सरस्वती देवी, माता शुभ्रतारा देवी, श्रीनाथजी, श्री रामचन्द्र अशा अनेक देवदेवतांची वैदीक भक्तीमार्गाचे गुढ पैलू उलगडून दाखवणारी अनोखी चित्रं मांडण्यात येणार आहेत. प्रतिमा, मंत्र आणि तंत्र यांचं दैवी अस्तित्व अधोरेखीत करणारी ही चित्रं साकार करताना त्या प्रत्येक साधनेचा साक्ल्याने अभ्यास केला गेला आहे.
सदर प्रदर्शनाविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार सुहास बहुळकर म्हणतात की “‘द डिव्हाईन दर्शन’ हे प्रदर्शन म्हणजे वैश्विक शक्तीचा साक्षात्कारच आहे. ही चित्रं म्हणजे फक्त रंग रेषांचा अविष्कार नसून दैवी शक्तीच्या अस्तित्वाची प्रचीती देणारी कलाकृती आहे. सकारात्मक भावना तयार करण्याची ताकद या चित्रांमध्ये असून वैश्विक शक्तींचं अधिष्ठान लाभलेली ही चित्रं आध्यात्मिक आनंद देणारी आहेत. चित्रकार प्रमोद पेंडसे यांनी ही चित्रं साकार केली एवढंच नसून ते हा मार्ग अनुभवत आले आहेत.”