रवींद्र नाट्यमंदिर कलांगणात पं. विश्वजीत रॉय चौधरी
‘प्रातःस्वर’च्या ८६व्या शृंखलेत प्रसिद्ध सरोदवादक पं. विश्वजीत रॉय चौधरी यांचे मंत्रमुग्ध करणारे सरोदवादन २६ मार्च २०१७ रोजी, सकाळी ६.३० वाजता होणार असून, त्यांना या मैफिलीत प्रसिध्द तबलावादक अमित चौबे तबल्यावर साथसांगत करणार आहेत. हा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिराच्या कलांगणमध्ये होणार आहे.
प्रात:स्वर ही संकल्पना ‘पंचम निषाद’ या संस्थेची असून त्याचे आयोजन गेले १० वर्ष पु. ल. कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या कलांगण येथे होत आहे. दर महिन्याच्या एका रविवारी ऑक्टोबर ते मे या कालावधीत, सकाळच्या रागांची मैफल येथे प्रस्तुत केली जाते. प्रातःस्वरमध्ये अनेक नवोदित कलाकार आणि काही दिग्गज कलाकारांनी आपल्या कलेने, भारतीय शास्त्रीय संगीताची रुची जोपासणाऱ्याना मंत्रमुग्ध केले आहे. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे येथे दरवेळेला नवीन कलाकाराला कला प्रस्तुती करण्यास संधी उपलब्ध केली जाते. आतापर्यंत प्रातःस्वर मध्ये ८५ नवनवीन कलाकारांनी आपला कलाविष्कार सादर केला आहे.
या मैफिलीसाठी संगीतप्रेमींना मुक्तप्रवेश असून, टाटा कॅपीटल या कंपनीचे प्रायोजकत्व लाभलेले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.