दर्जेदार सहा एकांकिकांचा महोत्सव
वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धेत, महोत्सवात सादर झालेल्या एकांकिकांचे प्रयोग रसिकांना बघता यावेत म्हणून ३० मार्चला दुपारी १२ वाजतापासून या ‘प्रयोगोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ‘पाझर’, ‘विभावांतर’, ‘दप्तर’, ‘श्यामची आई’, ‘इन सर्च आॅफ’ आणि ‘ओवी’ या सहा एकांकीकांचे प्रयोग सादर होणार आहेत.

कलासक्त महारातष्ट्रात एकांकिकांचं एक वेगळचं वलय आहे. नाटकवेडी मंडळी अशा स्पर्धांच्या शोधातचं असतात. म्हणूनच गेल्या वर्षभरात गाजलेल्या एकांकीका पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळणार आहे इलेव्हन अवर प्रोडक्शनने आयोजित ‘प्रयोगोत्सव’ या नावीन्यपूर्ण उपक्रमातून…

प्रयोगोत्सवद्वारे प्रेक्षकांना प्रत्येक एकांकिका घडवताना घेतली गेलेली मेहनत, एकांकिका सादर करणा-या संस्थेच्या आठवणी, किस्से तसेच विषयसुचकता, पारितोषिकं यांची माहिती प्रेक्षकांना देण्यात येणार आहे. संपूर्ण टिमशी प्रेक्षकांना संवाद साधता येईल. सर्व एकांकीकांचे प्रयोग झाल्यानंतर सिने-नाट्य कलाकारांच्या हस्ते संस्थाना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
तिकीटासाठी संपर्क
गणेश ढोलम- ९७७३८६७४०८
तेजस साठे- ७६६६५६६९१३
धवल म्हात्रे- ८१०८७२७१५२

