‘प्रेमाय नमः’ २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार
व्हॅलेंटाईन डेच्या आसपास बरेच रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होतात. अशीच एक प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘प्रेमाय नमः’. हा चित्रपट रोमँटिक आहेच: परंतु त्यातील प्रत्येक घटक म्हणजे कथा, संगीत, लोकेशन्स, दिग्दर्शनातं वेगळेपण बघायला मिळणार असून, मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘अंडरवॉटर सॉंग’ प्रेक्षकांना बघण्याची पर्वणी मिळणार आहे.

त्यावेळी श्रेयस तळपदे म्हणाले ‘मराठी सिनेमा नेहमीच उत्कृष्ट संहिता आणि दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडे त्याने तांत्रिक बाबींमद्धेही प्रगल्भता आत्मसात केलीय. प्रेमाय नमः मधील ‘अंडरवॉटर सॉन्ग’ बघून तर मी खूपच इंप्रेस झालोय. पूर्ण टीमला माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा!’
चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे निर्माता-दिग्दर्शकाने ह्या चित्रपटाचा ‘गेम’ तयार केला आहे ज्याचे ‘प्रेमाय नमः अँप’ देखील चित्रपटाच्या संगीताबरोबर लाँच करण्यात आले.
एखाद्या गोष्टीचे पाण्याखाली चित्रण करायचे म्हणजे खूपच कर्मकठीण काम! पण ‘प्रेमाय नमः’च्या टीमने अथक प्रयत्न करून रसिकजनांसाठी मराठी चित्रपटसृष्टीतले पहिले-वहिले ‘अंडरवॉटर’ गाणे चित्रित केले आहे. सिनेमातील प्रेमी युगुल देवेंद्र आणि रुपाली यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. दोघांनाही खूपच मेहेनत घेतली. इतर क्रू-मेम्बर्स ऑक्सिजन मास्क घालून पाण्याखाली राहू शकतात पण कलाकारांना ती मूभा नसते. दोघाही कलाकारांनी पाण्याखाली राहून श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा भरपूर सराव केला, प्रशिक्षित स्विमिंग इंस्ट्रक्स्टरच्या देखरेखीखाली जास्तीत जास्त पाण्याखाली राहून, श्वास रोखून, गाण्यातील बिट्सचे ध्यान ठेऊन, योग्य एक्सप्रेशन्स देऊन शॉट्स ओके करणे ही अत्यंत मुश्किल गोष्ट, परंतु देवेंद्र आणि रुपालीने खूप धाडसीपणे, दिग्दर्शकाचा पेशन्स सांभाळत, अपेक्षित परिणाम साध्य केला व सर्वांची वाहवा मिळवली.
डीओपी धनाजी यमकार यांच्या कॅमेऱ्याने कमाल केली आहे जी प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करेल. निर्माते उत्तम चोराडे यांनी अत्युत्तम प्रतीचे व्हीएफएक्स वापरून गाण्याचे अंतिम स्वरूप आकर्षक केले आहे जेणेकरून प्रेक्षकांना थरार व प्रेम एकत्रित अनुभवता येईल.
‘झालो बेभान मी’ हे मराठीतले पहिले ‘अंडरवॉटर सोंग’ प्रेक्षकांना नक्कीच बेभान करील जे रामोजी फिल्म सिटी आणि निसर्गरम्य मालवणच्या समुद्रात चित्रित करण्यात आले आहे.
उत्तम चोराडे यांची निर्मिती असलेला प्रेमाय नमः प्रेझेण्ट करताहेत विजय शिंदे व महेश जोके ज्याचे दिग्दर्शन केलंय जगदीश वाठारकर यांनी. देवेंद्र चौघुले, रुपाली कृष्णराव, प्राची, सुरेखा कुडची, प्रकाश धोत्रे, भरत दैनी, गौरी मगदूम आणि स्नेहालराज अभिनित व के. संदीपकुमार व चंद्रशेखर यांच्या संगीताने नटलेला प्रेमाय नमः प्रेक्षकांच्या भेटीला येतोय २४ फेब्रुवारीला!