‘हलाल’नंतर बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण
‘हलाल’ या चित्रपटातून अप्रतिम अभिनयासाठी विविध फिल्म फेस्टिवलमध्ये प्रशंसा आणि सर्वांची दाद मिळवणारी प्रीतम कागणे आता हिंदी चित्रपटात झळकणार आहे. सोहा अली खान आणि वीर दास यांच्यासोबत प्रीतम ’31 ऑक्टोबर’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

’31 ऑक्टोबर’ या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित असून, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेली दंगल यावर भाष्य करतो. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित हा चित्रपट ७ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रीतम तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबद्दल म्हणते कि, ‘मी 31 ऑक्टोबर या चित्रपटात सोहा अली खान हिच्या बहिणीची भूमिका करतेय. माझ्या पात्राचं नाव दिलप्रीत आहे. दिलप्रीत ही सिख धर्माची आहे आणि या दिलप्रीतचं स्वतःच कुटुंब आहे. इंदिरा गांधी यांची त्यांच्या सिख अंगरक्षकांकडून झालेल्या हत्येनंतर सिख धर्माविरुद्ध झालेल्या दंगलीमध्ये सर्व सिख कुटुंब कशी होरपळून निघतात हे या चित्रपटात दाखवले आहे.’
प्रीतमने याआधी मिस्टर बिन (२०१३) या मल्याळम तसंच नवरा माझा भवरा (२०१३) या मराठी चित्रपटात काम केले आहे.