माधुरी देसाई करणार बारडान्सरची भूमिका

बाब्याने घेतलेल्या बदल्यात झालेला कल्याणीचा मृत्यू अक्कासाहेब पचवू शकलेल्या नाहीत. कुटुंबातील कुणीच कल्याणीची जागा घेऊ शकत नाही असे त्यांचे मत असते. इतके दिवस तत्वाला धरून वागणाऱ्या अक्कासाहेब, आता व्यावहारिक होण्याचे ठरवतात. तत्वाला धरून वागूनकाही उपयोग झाला नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला असतो.
अक्कासाहेबांच्या या नव्या रूपानं कुटुंबातील प्रत्येकजण अवाक् झालाआहे. इतक्यातच समीर कल्याणी नावाच्या एका बारडान्सरला भेटतो आणि त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळते. आता ही नवी कल्याणी कोण आहे, तिचा नक्की हेतू काय, समीर- कल्याणीच काही नवे नाते तयार होईल का ?, अक्कासाहेब याबाबत काय भूमिका घेतील ? असा उत्कंठावर्धक कथानकाचा प्रवास ‘स्टार प्रवाह’च्या’पुढचं पाऊल’ मध्ये घडणार आहे.