शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन
क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ या मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एक इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये रुपांतर केले. तावडे मंडळाच्या कार्यकर्त्यांची जिद्द आणि चिकाटीमुळे तावडे अतिथीभवन सारखी दिव्य भव्य वास्तू आज दिमाखात उभी राहीली. भविष्यात तावडे मंडळाच्या युवा पिढीने पुढाकार घेऊन तावडे मंडळाच्या युवकांची शाखा अथवा मंडळ निर्माण करावे. युवकांच्या या मंडळाने मुंबई आणि राज्यापुरते मर्यादीत न राहता या युवा मंडळाने आपल्या समाजाचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

त्रिवेणी संगम आणि तावडे समजण्याचा आठशे वर्षाचा इतिहास असलेल्या वास्तूत सुमारे पंधरा हजार चौ.फूट. बांधकाम असलेली बेसमेंट आणि दोन मजली इमारत असून येथे राहण्यासाठी सुसज्ज आठ रूम, समोर सुंदर उद्यान सांस्कृतिक व सामाजिक केंद्र इत्यादी सुविधा आहेत. येथे निसर्गाने केलेली मुक्त उधळण केलेली असून, पुरातन महाकाली मंदिर आणि निवासाची उत्तम सोय या वास्तुमुळे उपलब्ध झाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकाना व भाविकांना एक पर्वणी ठरणार आहे. यापुढे ही वास्तू सर्वांसाठी मार्केट दराने तर तावडे बंधूंसाठी माफक दारात उपलब्द करून देण्यात येणार आहे असे तावडे हितवर्धक मंडळांचे अध्यक्ष दिनकर तावडे म्हणाले.

याप्रसंगी सतीश तावडे यांनी प्रास्तिवक केले. खासदार राऊत, आमदार जाधव यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. तर आर्किटेक्ट संतोष तावडे व अध्यक्ष दिनकर तावडे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.