राजू बाविस्कर आणि विकास मल्हारा यांचे चित्रप्रदर्शन सुरु
सुप्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर आणि विकास मल्हारा यांचे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी . रोड, काळा घोडा, मुंबई येथे २० मार्चपासून सुरु झाले असून ते ते २६ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.
राजू बाविस्कर


खिरोदा येथे कला महाविद्यालयामध्ये शिक्षण करुन पिँप्राळा येथील पी.एम.मुंदडे पिंप्राळे या शाळेत कला शिक्षक म्हणून रुजू झाले या मुळे लौकिक प्रश्न संपले, पण आतली घालमेल कायम होती. या सर्व जगण्याच प्रकटीकरण करण्याच माध्यम म्हणजे चित्र, या मधून व्यक्त होत राजू बाविस्कर हा चित्रकार प्रवास करतो आहे. अनेक साहित्य नियतकालिक, पुस्तक ही राजू बाविस्कर यांच्या ऱेखाचित्राने प्रसिद्ध आहेत. चित्रकले इतकेच साहित्य क्षेत्रामध्ये पण राजू बाविस्कर हे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे.
चित्रकलेमधील राष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषिक मिळाली आहेत, पण खरा कलावंत सतत अस्वस्थ असतो तसे सर पण कलेमध्ये सतत अस्वस्थ आहेत. त्यांचा शोध निरंतर सुरु आहे.
कोलते सर म्हणाले की राजू नक्कीच मोठा पेंटर होईल त्याच्यामध्ये त्या शक्यता आहेत. यात राजू बाविस्कर यांचं मोठेपण आहे.
कमर्शियल काम वा लैंडस्केप वगैरे केल तर व्यावसायिक वा लोकप्रिय होण सहज व सोप असताना हा माणूस आपल्या मधील शक्यता विविध फॉर्म मधून हाताळून बघतो , हे मोठा चित्रकार होण्याच्या दृष्टीने टाकलेल पाऊल आहे. परिवर्तनच्या अनेक चित्र प्रदर्शनाच श्रेय हे राजू बाविस्कर सर यांनाच आहे.
विकास मल्हारा

सूर्यकिरणांनी उत्तुंग शिखरांना स्पर्श केला आणि अचानक ती संपूर्ण पर्वतराजी पेटून उठली. जणू काही आतुनच धगधगत असवी असं अलौकिक तेज होतं. दऱ्याखोऱ्या अधिकच गडद गहिऱ्या झाल्या आणि शांतता असीम, अमृत! त्या अपार सौंदर्याने थक्क होऊन पृथवीनंही श्वास रोखला.
जसजसं ते अरुणकमल प्रचीवर फुलू लगलं तसतशी त्या राजबिंड्या पर्वतरांगांची देदीप्यमान विराटता, शुद्ध सात्विकता जणू हाताने स्पर्शता यावी इतकी जवळ आल्यासारखं वाटली; पण ते सर्व कित्येक योजने दूर होते. आणि दिवसाचा आरंभ झाला. सदासर्वदा, क्षणोक्षणी, निसर्गाची चिरंतन गूढता मी अनुभवतो, पाहतो… आणि व्यक्त करतो.