सिनेमाच्या गाण्याचा मुहूर्त संपन्न
लव मनी फिल्म्स या निर्मिती संस्थेचा ‘राम रतन फुलपगारे’ या सिनेमाच्या गाण्याचा मुहूर्त नुकताच अंधेरीतील एका स्टुडिओमध्ये पार पडला. वैभव देकाटे यांची निर्मिती असलेला हा पाहिलाच मराठी चित्रपट असून, शैलेंद्रसिंग राजपूत यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत विजय पाटकर, प्रिया बेर्डे, डॉ. विलास उजवणे, नरेश बिडकर, किशोर महाबोले, दिपज्योति नाईक यांच्या असून नवोदित रजत व समृद्धी आणि मंगेश व योगिता यांच्या जोड्या आहेत. सदर सिनेमा, प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करून देईल, असा विश्वास सिनेमाचे सहनिर्माते शब्बीर राज यांनी व्यक्त केला