एकाच कलादालनात पाच रंगलेखकांच्या कलाकृती
पाच सुप्रसिद्ध चित्रकारांचं ‘रंग अध्यात्म’ हे समूह चित्रप्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये २७ सप्टेंबरपासून सुरु होणार असून ते ३ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.




अनिल गायकवाड निसर्गाला आपल्या कलाकारीने साकार करतात. जे दिसतं तेवढंच निसर्गविश्व नसून त्या पलिकडेही काही छटा आहेत आणि त्या सामोर्या आणण्याचं काम त्यानी केलं आहे.


उत्तम चापटे यांची चित्रं पाहताना कॅनव्हासवर रंग पसरत आहेत असा आभास निर्माण होतो. एकाच रंगाच्या अनेक छटा अंतर्मानाला सुखाऊन टाकतात. पहाणार्याच्या अनुभूती आणि चित्तवृत्ती प्रफुल्लीत करण्याची ताकद या चित्रांमध्ये आहेच आहे. बहुआयामी चित्रकलेचा सुंदर गोफ या प्रदर्शनात गुंफला गेला असून कलाकृतींची लय आणि त्यामधून प्रतित होणारं संगीत मनाला स्पर्शून जातं.