१० नोव्हेंबरला येणार चित्रपटगृहांत
आजपर्यंत एकापेक्षा एक धमाल कलाकृती साकारल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे ‘रंगीला रायबा’ हा एक रंगतदार असा चित्रपट घेऊन येत आहेत.

दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट वितरक विजय बाबू डी. यांची श्री. विजय साई प्रॉडक्शन ही संस्था आणि या पोस्टरमध्ये दिसणारे फ्रेश चेहरे आल्हाद आणि राधिका हे ‘रंगीला रायबा’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
अतिशय रंगतदार पोस्टर आणि हटके नाव यामुळे ‘रंगीला रायबा’ अल्पावधीतच सोशल मिडियावर चांगलाच viral झाला आहे.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘रंगीला रायबा’ची कथा त्रिनधा राव यांनी तर पटकथा चिन्मय कुलकर्णी यांची आहे. चिन्मय कुलकर्णीसोबत चेतन डांगे यांनी या चित्रपटाचे खुसखुशीत संवाद लिहिले आहेत,
छायालेखन सुरेश देशमाने तर संकलन मनिष मिस्त्री यांनी केले आहे. संगीत पंकज पडघन आणि निषाद तर पार्श्वसंगीत शेखर चंद्रा यांचे आहे. कार्यकारी निर्माता सुरेश शिंदे आहेत.
हा ‘रंगीला रायबा’ १० नोव्हेंबरपासून आपल्याला भेटायला येत आहे.