रात्रीस खेळ चाले मालिकेतील नाईकांच्या वाड्यात आजवर गुढ आणि रहस्यमय गोष्टीच घडत होत्या: पण आता इथे हास्यकल्लोळ उडणार आहे. दस-याच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रंगणार आहेत दोन विशेष भाग. आज सोमवारी आणि उद्या मंगळवारी प्रसारित होणा-या भागात या दोन्ही टीमची धम्माल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

रात्रीच्या खेळात ‘चला हवा येऊ द्या’चा हास्यकल्लोळ!
नाईकांच्या वाड्यावरची धम्माल आज-उद्या झी मराठीवर
थुकरटवाडीची मंडळी या वाड्यावर येणार आणि नाईक कुटुंबाला आपल्या मंचावर घेऊन जाणार आहेत. यासाठी कारणही तसंच खास आहे ते म्हणजे दसरा सणाचं. गोव्यातील मडगाव येथे या खास भागाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. शिवाय कोकणातील आकेरी गावात असलेल्या नाईकांच्या वाड्यावरसुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंडळीने जाऊन एकच धम्माल उडवून दिली होती. ही सर्व धम्माल आज आणि उद्या रात्री ९.३० वा. झी मराठीवर बघता येईल.