‘नमस’ आणि ‘जी फोर’ रेस्टारंटची घोषणा
मतदानाचा हक्क बजावा. कर्तव्य पार पाडा आणि मतदान केल्याची निशाणी दाखवून ताडदेव येथील ‘नमस’ आणि गिरगांव येथील ‘जी फोर’ या रेस्टारंटमध्ये ५० टक्के सवलतीने जेवण घेण्याची संधी मिळवा, अशी योजना आखली आहे.
लोकशाहीने जनतेला दिलेला सगळ्यात मोठा ह्क्क म्हणजे मतदान. आपल्यावर कोण राज्य करणार आपल्या देशाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची हे आपण ठरवतो. आणि हा आपला हक्क बजावण्यासाठी मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. पण दुर्देवानं आपल्याकडे मतदानाविषयी हवी तितकी जागरुकता नाही. ही जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होत असतात.
याच प्रयत्नांना थोडासा हातभार लावत आहेत ताडदेव येथील ‘नमस’ (गंगा जमुना टॉकीजसमोर) आणि गिरगांव येथील ‘जी फोर’ (प्रार्थना समाज) प्युअर व्हेजिटेरिअन रेस्टारंट! मतदानाचा हक्क बजावा…..कर्तव्य पार पाडा आणि मतदान केल्याची निशाणी दाखवून आमच्या दोन्ही रेस्टारंटमध्ये ५० टक्के सवलतीने जेवणाचा आस्वाद घ्या आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद साजरा करा! ही सवलत फक्त २१ फेब्रुवारी रोजी उपलब्ध असून अधिक माहितीसाठी शिवम – ८६५२६०२२७२, लोबो – ८१६९७५११५२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.