रंगमैत्र ***
होस्टेलवर राहणारी दोन मुले आणि एक मुलगी रात्री खिळकीच्या मार्गाने बाहेर पळतात. त्यातील राजच्या पुढाकाराने ते तिघेही एका ट्रकमध्ये गुपचूप बसून प्रवास करायला लागतात. ते नक्की कुठे चालले या प्रवासाची उत्सुकता आणि दुसरीकडे ते पळून गेल्याने शाळेत आणि निवासी हॉस्टेलमध्ये उडालेला गोंधळ, कुठे गेले असतील याचा शोध घेण्यासाठी तिघांच्याही आयुष्याचा फ्लॅशबॅक हे सारे काही उत्सुकता वाढवणारे असून, या चित्रपटात कौल कशाचा घेतला जातो, हे बघणे कुतूहल वाढवणारे आहे.

अशीच तारुण्याच्यावाटेवर असताना भरकटलेल्या तीन मुलांची गोष्ट ‘कौल मनाचा’ या चित्रपटात दाखवली आहे. ते हॉस्टेलमधून का पळून जातात, कुठे जातात, कशासाठी जातात हे सगळे ‘कौल मनाचा’ या चित्रपटातून बघायला मिळते.

साई गोविंद खरटमोल या बालकलाकारासह अनेकांच्या छोट्या छोट्या भूमिका लक्षवेधी आहेत.
‘श्री सदिच्छा फिल्म्स’ निर्मित हा चित्रपट ‘रेड बेरी एन्टरटेंन्मेंट’ने प्रस्तुत केला आहे. बालमनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करताना मुख्य भूमिका साकारणाऱ्या राज कुंडलला उगीचच चित्रपटाचे वेड असल्याचे दाखवले आहे. ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे, ते टाळले असते तर चालले असते. महत्वाच्या क्षणी त्याला विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याची मनाई करण्यात येते, त्याचे कारण स्पष्ट होत नाही. चित्रपटाचा शेवट हाच धागा घेऊन होत असल्याने ते कथेची गरज म्हणून लावलेले ठिगळ वाटते. अशा काही उणीव सोडल्या तर चित्रपट छान झाला आहे. राजचे चलबिचल मनाची अवस्था दाखवण्यासाठी त्याला कधी शिक्षेकेविषयी, कधी शाळेतील मुलीविषयी आकर्षण वाटणे हे उत्तम अधोरेखित करण्यात आले आहे.
या चित्रपटाची कथा भीमराम मुडे यांची असून त्यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पटकथा भिमराव मुडे व श्वेता पेंडसे यांची असून सवांदलेखन श्वेता पेंडसे यांनी केलं आहे. नितीन घाग यांनी छायाचित्रणाची व संतोष यादव यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषा नितीन भावसार व कलादिग्दर्शन संजीव राणे याचं आहे.
‘कौल मनाचा’
प्रस्तुतकर्ते : रेड बेरी एन्टरटेंन्मेंट
निर्मिती : श्री सदिच्छा फिल्म्स
निर्माता : राजेश पाटील ,विठ्ठल रूपनवर , नरशी वासानी
सहनिर्माती : निकिता राजेश पाटील
दिग्दर्शक : भीमराव मुडे
छायाचित्रण :- नितीन घाग
संकलन : संतोष यादव
कथा : भीमराव मुडे
पटकथा : भीमराव मुडे, श्वेता पेंडसे,
संवाद : श्वेता पेंडसे
गीतलेखन : मनोज यादव
संगीत : पार्श्वसंगीत : रोहन रोहन
गायक : श्रेया घोषाल, अरमान मलिक, आदर्श शिंदे, रोहन रोहन, प्राजक्ता शुक्रे
कलादिग्दर्शन : संजीव राणे
कार्यकारी निर्माते : लक्ष्मण जाधव
कलाकार : राजेश शृंगारपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, जयवंत वाडकर,
विजय गोखले, वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे,
आशुतोष गायकवाड, गिरीजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे, लव विसपुते, साई गोविंद खरटमोल.