साउथच्या नृत्यविश्वात मुंबईचा नृत्याविष्कार
साउथला सध्या गाजत असलेल्या, उदया टीव्हीवरच्या ‘किक’ या डान्स रियालिटी शो मध्ये सोळा राउंडचा टप्पा पार करत रिचा अग्निहोत्रीनं अंतिम फेरी गाठली आहे.


नवीन डान्स पार्टनर, कन्नडा भाषेची फारशी जाण नसताना आणि नवीन कोरिओग्राफर असूनही तिनं सादर केलेल्या नृत्यांना जबरदस्त दाद मिळाली. साउथचे नावाजलेले अभिनेते आणि या शोचे परीक्षक शिवराजकुमार, रचिता राम आणि हर्षा मास्टर यांनी तिच्या नृत्याची आणि एक्सप्रेशन्सची तुलना माधुरी दीक्षितबरोबरही केली. तपनगुची या साउथ इंडीयन डान्सच्या राउंडमध्ये हेवी बिट्सवर डान्स करत कॉमेडी परफॉरमन्सही तिने केला आणि त्या आठवड्यात परफॉर्मन्स ऑफ द विक हा किताब पटकावला.
प्रॉपर्टी राउंडमध्ये फक्त एका कापडाच्या तुकड्याचा वापर करत एका कन्नडा सॉंगवर परफॉर्म करून त्या आठवड्यात पूर्ण मार्क्स मिळवत हार्ट आणि कँप हे मानाचं गिफ्ट मिळवलं. या नृत्याच्या अनोख्या प्रवासात जुरीज्कडून मिळणारा फायर ब्लास्ट तीनं सात वेळा पटकावला. साउथच्या नृत्यविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मराठी मुंबईकर रिचाचे विशेष कौतुक होत आहे.