राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट
वितरक न मिळाल्याने काही आशयघन सिनेमांपासून प्रेक्षकांना वंचित रहावं लागत आहे. या यादीतील काही नावं म्हणजे ‘कासव’, ‘दशक्रिया’, ‘हलाल’… याच यादीत काही दिवसांपूर्वी अजून एक नाव होतं ‘रिंगण’… यातून ‘रिंगण’ची मुक्तता झाली असून ३० जूनला सिनेमागृहांत दाखल होत आहे.

या राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मैदानात विजयाची पताका फडकवणारा रिंगण अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आपली निर्मिती प्रेक्षकांसाठी मनोरंजनाबरोबर बोधपूर्णही असावी या विचारांच्या विधि कासलीवाल यांनी प्रेक्षकांमध्ये जगण्याची नवी उमेद जागवणारा, मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ प्रेक्षकांना प्रेझेंट करायचे ठरवले आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोलमोशन पिक्चर्स निर्मित ‘रिंगण’ ३० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.