१० ऑक्टोबरपासून नवी मालिका
गेली चार दशकं मराठी सिनेनाट्य क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे पुरुषोत्तम बेर्डे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाहच्या ‘गSSS सहाजणी’ या हटके मालिकेची निर्मिती पुरुषोत्तम बेर्डे करत असून, एकाच मालिकेत सहा नायिका असा नवा प्रवाह ते घेऊन येत आहेत. १० ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होत आहे.

नुकताच या मालिकेचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांनीदेखील भरघोस प्रतिसाद दिला आहे.