कुमारस्वामी हॉलमध्ये १७ मार्चपासून प्रदर्शन
प्रथितयश आणि नव्या कलाकारांचा सहभाग असलेलं ‘सहयोग’तर्फे आयोजित करण्यात येणार्या कलाकृतींचं दुसरं कलाप्रदर्शन मुंबईत भरवण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन कुमारस्वामी हॉल, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, काळा घोडा, महात्मा गांधी रोड, फोर्ट मुंबई ४०० ०२३ येथे दिनांक १७ ते २१ मार्च २०१८ या काळात सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.

पूर्वीच्या आवृत्तीत सहयोगच्या उपक्रमात १८ कलाकार सहभागी झाले होते. त्या प्रदर्शनामुळे काही कलाकारांना इतर गॅलरी आणि प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन आपल्या कलाकृती विकण्याची संधी प्राप्त झाली होती. या वर्षी २१ कलाकार आपली चित्रं आणि शिल्पं मांडणार आहेत.
सदर प्रदर्शनातील विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग कोनार्क कला फाउंडेशनला दिला जाईल. कोनार्क कॅन्सर फाउंडेशनसह अनेक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कर्करोग पिडीतांना व त्यांच्या आश्रित लोकांना मदत पुरविण्यासाठी कोनार्क कॅन्सर फाउंडेशन कार्यरत आहे.

उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या कॅन्सर रुग्णांना मदत करण्यासाठी के.सी.एफ प्रयत्न करत आहे मुख्यतः निवास, परिवहन ध्यान, सर्जिकल टेस्ट अॅम्प्लेटीमेंट आणि आर्थिक भार अशा प्रकारची मदत केली जाते.
सदर प्रदर्शनात कांस्य, धातू, लाकूड आणि मिक्स मिडीया, तैल रंग, जल रंग, चारकोल, पेन आणि शाई,पेस्टल्स यांचा वापर करून साकार केलेल्या मुर्त, अर्ध-मुर्त आणि अमूर्त शैलीतील कलाकृती प्रदर्शीत केल्या जाणार आहेत. नृत्यातील सौंदर्य आणि त्याचे चमत्कार, संवेदनशील मनुष्य, आध्यात्मिक, वास्तववादी तसंच भावनिक संदर्भ दर्शविणारं काम या प्रदर्शनात पाहाता येईल.