मराठी चित्रपटसृष्टीत ‘साई नक्षत्र’ निर्मिती संस्थेचे आगमन होत असून, ही संस्था ‘जळू’ नावाच्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरवात करणार आहे. महिलांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या या सिनेमातील स्टारकास्ट अद्याप गुलदस्त्यात असून, यात महत्वाची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष या साकारणार असल्याचे कळते.

‘साई नक्षत्र’च्या ‘जळू’मध्ये ज्योती सुभाष!
निर्माते अजितकुमार धुळे यांची ही ‘साई नक्षत्र’ संस्था असून, जळूचे लेखन तेजस तुंगार यांनी केले आहे. या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरवात होणार आहे.
सी.आय.डी, आहट, मधली सुट्टी, कॉमेडी एक्सप्रेस यांसारख्या एकापेक्षा एक मालिकांचे संकलक निखिल भोसले या चित्रपटाचे दिग्दर्शन व संकलन करणार आहेत. नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर करणार असून नितीन चांदोरकर हे कार्यकारी निर्मिता म्हणून जबाबदारी पार पडणार आहेत.
वास्तववादी असणारा जळू हा सिनेमा महिलांना नक्कीच प्रेरणा देणारा असेल. महिला सशक्तीकरण होणे हे काळाची गरज आहे, तोच विषय घेऊन आम्ही ‘जळू’ची निर्मिती करीत असल्याचे निर्माते अजितकुमार धुळे यांनी सांगितले. सिनेमाचे चित्रीकरण एप्रिल व मे महिन्यात होणार असल्याचे, दिग्दर्शक निखिल भोसले यांनी सांगितले.