२५ मार्चला दादरमध्ये मध्यान्ह आरती
सालाबादप्रमाणे याहीवर्षी रामनवमीनिमित्त साईसेवक मंडळाची पालखी शनिवार २५ मार्चला दादर साईनिकेतन येथून दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती करून श्री क्षेत्र शिर्डी येथे निघेल. या वर्षीचं पालखी पूजन व मध्यान्ह आरती सुरेश हावरे (अध्यक्ष श्री साईबाबा संस्थान) यांच्या हस्ते होणार आहे.
साईबाबांची पालखी घेऊन या मंडळांतील हजारो भक्त रामनवमीच्या उत्सवासाठी दरवर्षी शिर्डीला जातात. या मंडळाचे नाव आहे… साईसेवक मंडळ. १९८१ साली स्थापन झालेल्या आणि सर्वप्रथम पदयात्रा सुरु करणाऱ्या या साईसेवक मंडळातील साईभक्तांचा आकडा आता आठ ते साडेआठ हजारांवर गेला आहे. या मंडळाच्या पालखी सोहळ्याची सुरूवात मुंबईतून साईबाबांच्या भव्य मिरवणुकींनी होते. पालखी घेऊन वारकरी दिंडीप्रमाणे श्री क्षेत्र शिर्डीत पोहचताच श्री साईंचा एकच जयघोष होतो.
भक्तीप्रमाणे सेवेचे व्रत आकारून साईसेवक मंडळ विविध क्षेत्रांतील उपक्रमांमध्ये स्वत:चा सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. उपरोक्त मंडळाच्या वतीने अनाथ मुलांना शाळोपयोगी वस्तू, गणवेश दिले जातात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात येतो. शिर्डी येथे साईभक्तांच्या निवासाची योग्य ती सोय व्हावी यासाठी भविष्यात मंडळातर्फे धर्मशाळा बांधण्याची योजना ही प्रयोजित आहे.
यंदाच्या पालखी वारकरी पदयात्रेत जास्तीत जास्त साईभक्तांनी सहभागी व्हावे अशी विनंती साई सेवक मंडळाचे कार्याध्यक्ष नामदेव मळीक व सचिव अशोक देसाई यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी – www.