आकाश ठोसरचा नवा चित्रपट २ जूनला येतोय
महेश मांजरेकरांचा बहुचर्चित आगामी ‘F.U.’ या चित्रपटाचे ‘टीजर पोस्टर’ बॉलिवुड सुपरस्टार सलमान खानने ट्वीट केले आहे. या पोस्टरमध्ये आजकालच्या तरुणांचा ‘yo स्टाइल’-स्टायलिश हात दिसत आहे ! हातामध्ये फॅशनेबल लेदरचे ब्रेसलेट आणि तरुणांचे फेवरेट लेदर जॅकेट दिसत आहे!
‘He is back’ असे ठळकपणे लिहिलेल्या या पोस्टरवरून नक्कीच एक प्रश्न पडतोय की ‘सैराट’मधून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेला परश्या अर्थात आकाश ठोसरचा या नव्या चित्रपटात नक्की कसा लूक असेल?
‘F.U.’चे पुढील पोस्टर १४ एप्रिलला सकाळी ११.३५ ला सोशल मिडियावर लॉन्च होईल. प्रेक्षकांना पुढच्याही पोस्टरची उत्सुकता लागलीये कारण त्या पोस्टरमध्ये तरी आकाशचा नवा लूक दिसेल का? आकाशचा नवा लूक आणि महेश मांजरेकरांच्या नव्य सिनेमाची जोरदार चर्चा सिनेसृष्टीत चालू आहे. हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार असून, तेव्हापर्यंत सोशल मिडियाद्वारे या चित्रपटाची उत्सुकता ताणून धरली जाईल, याची चाहूल सलमान खानने ट्वीट केलेल्या टीजर पोस्टरने दिली आहे.