प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे लिखित बहुचर्चित आणि पारितोषकप्राप्त ‘तमाशा’ या देखण्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती परम मित्र प्रकाशन यांच्यातर्फे २ एप्रिलला प्रकाशित होणार आहे.
लोकार्पण समारंभ पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या बॅ. नाथ पै सभागृहात रविवारी (२ एप्रिल २०१७) सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ आणि लोकप्रिय लोक-कलावंत रघुवीर खेडकर यांच्या हस्ते होणार आहे. पद्मश्री डॉ. गणेश देवी समारंभाचे अध्यक्ष आहेत. आपण या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन परम मित्र पब्लिकेशन्सचे माधव जोशी यांनी केले आहे. पुस्तकाची किमत रु.- ९५०/- असून, लोकार्पण समारंभाच्या दिवशी हे पुस्तक सवलतीच्या दरात ७०० रुपयांना मिळू शकेल.