संगीत आणि नृत्याआविष्कारांचे सादरीकरण
‘संगीतांजली’ या संस्थेने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘अनूपम सृजन’ हा कार्यक्रम १३ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी ६.४५ वाजता रंगशारदा सभागृह, बांद्रा रिक्लेमेशन, मुंबई येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात नावीन्यपूर्ण संगीत व नृत्य सादर केले जाणार आहेत.

आचार्य पंडित अनुपम राय यांनी शास्त्रीय नृत्य आणि संगीताबद्दल बोलताना सांगितले की, “वेद हे नादांचे संकलन आहे (नाद), ज्याचा आरंभ भगवान शिव यांनी केला आहे, भगवान नटराज यांनी ताल आणि नृत्याचा आरंभ केला आहे तर देवी सरस्वतीने मधुर स्वराचा स्वरसाज चढविला आहे”.’
अनूपम सृजन” हा कार्यक्रम नटवारी कत्थक नृत्य आणि कुटूप (आर्केस्ट्रा) सह शास्त्रीय संगीताचा एक सुंदर संगम आहे आणि या कार्यक्रमात प्राचीन वैदिक संस्कृती ते मुघल काळापासून आजच्या सूफीसंगीतापर्यंत संगीताचा प्रवास उलघडून सांगण्यात येणार आहे व प्रथमच संगीत विश्वात प्राचीन संगीत आणि नृत्य एकत्र पाहायला मिळणार आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्देश युवकांमध्ये भारतीय कला आणि पारंपारिक संस्कृती विषयी लोकांमध्ये आणि विशेषत: तरुण युवापिढीमध्ये शास्त्रीय संगीत आणि नृत्या विषयी स्वारस्य निर्माण करणे हे आहे.

कार्यक्रमाचा पहिला भाग भगवान शिव यांना समर्पित असेल व दुसऱ्या भागात मुघल संस्कृती सादर केली जाईल. कार्यक्रमात ३ मुख्य कलाकार कत्थक नृत्य सादर करणार आहेत, अनुरत्न राय यांनी वयाच्या ९ व्या वर्षी ऐतिहासिक जागतिक विक्रम केला होता आणि याची नोंद “लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स”मध्ये केली गेली आहे, श्रिया पोपट या प्रख्यात कत्थक नृत्यकार आहेत व अनुरिता राय यांनी १०,००० चक्रा असा कत्थक नृत्याचा जागतिक विक्रम केला होता. प्रख्यात नृत्यकार गुरु माँ विदुशी रीटा राय देखील उपस्थित असणार आहेत.
कार्यक्रमाचा पहिला भाग प्राचीन सनातन काळावर आधारित असेल व यात शिव पंचाक्षर स्तोत्र, रावण क्रित शिव तांडव आणि शिव भगवान यांना समर्पित प्रबंध रचना यावर नटवरी कथक नृत्य सादर केले जाईल.

कार्यक्रमाच्या दुसर्या भागात, मुघल काळात सादर केले जाणारे तराना- गायीकीवर आधारित नृत्य शैली पाहायला मिळणार आहे. तरणा गायकीचे (भाषांतर) कत्थक नृत्यात सादरीकरण केले जाणार आहे व त्यानंतर गझलदेखील सादर केली जाईल. कार्यक्रमाची सांगता सुफियाना क़लामनंतर होईल. अनुपम स्रीजनच्या सादरी कारणासाठी तबला, पखवाज, बासरी, गिटार आणि ढोलक यांच्यातील सुप्रसिद्ध मंडळी नृत्य आणि गायनाला साथ देण्यासाठी उपस्थित असतील.
दिनांक : १३ फेब्रुवारी २०१८
वेळ : संध्याकाळी ६.४५ पासून
स्थळ: रंगशारदा सभागृह, बांद्रा रिक्लेमेशन, मुंबई
मोफत प्रवेश