चित्रकाराचे मनोगत
असे हे काव्य मला चित्ररूपाने साकारण्यात अतोनात आनंद मिळतो. अभूतपूर्व समाधान मिळते. या चित्रातनं समाजप्रबोधन होतं. आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा नी वारसा जपण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी करू इच्छितो. माझं लाडकं दैवत प्रभू श्रीराम नी आवडता विषय ‘रामायण’. देवी देवतांचीच चित्रे रेखाटण्यात मला जास्त रस आहे. मी त्यात रममाण, बेधुंद होतो. प्रभूंच्या कृपेने चित्रातील सूक्ष्म बारकावे माझ्याकडून असे काही चितारले जातात की चित्रे सजीव वाटू लागतात. वयाच्या 11 व्या वर्षी टीव्ही सिरीयल ‘रामायण ‘ पाहून मला भुरळ पडली, मी खूप प्रभावित झालो. रामायणावर आधारित सिरीज चितारण्याचा निर्णय ठाम केला. 2002 पासून मी रामायणातील दृश्ये जसे रामजन्म, गुरुकुल, ताटका वध पेन्सिलस्केचने ड्रॉइंग पेपरवर चितारण्यास सुरवात केली. पेन्सिलवर्क करणं एक वेगळं आव्हान रामाच्या आशीर्वादाने मी स्वीकारलं . ऍनिमेशन फिल्डमध्ये कार्यरत राहून मिळालेल्या तुटपुंज्या वेळेत आपल्या कलेची आराधना मी करीत आलो आहे. मला जणू रामाचा ध्यास लागला आहे. कलारसिकांना ते प्रकर्षाने जाणवतं. बालकांड नी अयोध्याकांड पेन्टिंग्स साकारल्यात. मला आपली संस्कृती घराघरांत पोचवायची आहे नी तिचे जतन करायचे आहे.
चित्रकाराची थोडक्यात कहाणी
गोरेगावस्थित रामायण आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असणारे वास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड गेली 16 वर्षे अॅनिमेशन फिल्डमध्ये स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहेत. पेन्सिलस्केचवर उत्तम प्रभुत्व असणारे लाड हे उपजत कलाकार असून बालपणापासूनच त्यांनी आपल्या वडिलांसोबत फिल्म पोस्टर चित्रकारीतेचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासूनच झालेले आहेत. काहींना उपजतच एखाद्या कलेचे गुण आत्मसात झालेले असतात. लाड अशा कलाकारांच्या पठडीत येतात. पोटापाण्यासाठी आधुनिकतेचा हात पकडत लाड यांनी २००४ साली ऐम ऍनिमेशनमधून २-डी क्लासिकल ऍनिमेशनचे ट्रेनिंग घेत ऑन प्रॉजेक्ट काम करत ऍनिमेशन इंडस्ट्रीत प्रदार्पण केले नि त्यातही प्राविण्य मिळवले. हिंदी सिनेमा “माय डिअर फ्रेंड गणेशा -२”मध्ये त्यांनी दिलेले ऍनिमेशन त्याची साक्ष आहेत.
संतोष शंकर लाड
⦁ जन्मतारीख : 6 फेब्रुवारी 1976
⦁ पत्ता : प्लॉट क्र. ६, इमारत क्र. ९-ब- १५, कोयना सोसायटी, ना. नि. प. वसाहत, गोरेगाव पूर्व, मुंबई -४०००६५
⦁ मोबाइल क्रमांक : ९८९२३११०६७
⦁ ई-मेल : santoshleela@gmail.com
⦁ एच. एस. सी. पास वर्ष २०००
⦁ डिप्लोमा इन २-D क्लासिकल ऍनिमेशन ऐम अॅनिमेशन इन्स्टिटयूट, गोरेगाव. वर्ष २००४
⦁ फन -न – फेअरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स 2004
⦁ पेव्हमेंट आर्ट गॅलरी, काळा घोडा 2013.
⦁ आर्टिस्ट सेन्टर आर्ट गॅलरी ,काळा घोडा 2013
⦁ नेहरू सेन्टर आर्ट गॅलरी वरळी 2015
⦁ आर्ट एंट्रन्स आर्ट गॅलरी, काळा घोडा 2016
⦁ इंडिया आर्ट फेस्टिवल वरळी 2013
⦁ एक्स्प्रेशन 3, पु. ल. देशपांडे आर्ट गॅलरी, प्रभादेवी 2014
⦁ लीलाज आर्ट ग्रुपशो पु. ल. देशपांडे आर्ट गॅलरी, प्रभादेवी 2015
⦁ आर्टिस्ट सेन्टर अँनुअल शो काळा घोडा, 2015
⦁ आर्ट व्हिजन पु. ल. देशपांडे आर्ट गॅलरी, प्रभादेवी 2016
⦁ आर्ट व्हिजन ठाणे कला भुवन आर्ट गॅलरी 2017
⦁ आर्ट व्हिजन पु. ल. देशपांडे आर्ट गॅलरी, प्रभादेवी 2018
⦁ आर्टीव्हल आर्ट इव्हेंट, वर्ल्ड ट्रेड सेन्टर, एक्स्पो सेन्टर कुलाबा, 2019
⦁ ‘कॅनवासकॅप्स ‘ ग्रुप शो, डी डी नेरॉय आर्ट गॅलरी, चौपाटी, मुंबई, २०२०
⦁ वडीलांबरोबर सिनेमाचे पोस्टर रंगवायचे काम केले. मुंबई . वर्ष १९९३ ते २००० पर्यंत
⦁ मिरर डिसाइनर म्हणून प्रकाश मिरर कंपनीमध्ये काम केले आहे. मुंबई. वर्ष १९९८ ते २००० पर्यंत
⦁ क्लीन अप आणि ईनबीटवीन आर्टिस्ट म्हणून कॉसर कार्टून pvt ltd, मालाडमध्ये काम केले आहे. प्रोजेक्टचे नाव , न्यू टेस्टामेन्ट, डारसी, लेजेंड ऑफ ड्रॅगन इत्यादी. वर्ष २००३ ते २००७
⦁ २ -D ऍनिमेटर म्हणून ऐम अॅनिमेशन इन्स्टिटयूट, गोरेगाव येथे काम केले आहे वर्ष २००७ ते २००८ पर्यंत.
⦁ २ -D ऍनिमेटर म्हणून इंफोसीक कंपनी मध्ये बुद्धा सिरीयल साठी काम केले वर्ष २००७.
⦁ २ -D ऍनिमेटर म्हणून हिंदी सिनेमा ‘माय डिअर फ्रेंड गणेशा -2’ मध्ये काम केले आहे. वर्ष २००७ ते २००८ पर्यंत.
⦁ २ -D ऍनिमेटर म्हणून ‘सुलोचना’ ऍनिमेटेड सिरीयल कॉर्नरशॉप ऍनिमेशन स्टुडिओ पुणे इथे काम केले आहे .वर्ष २००८ ते २००९.
⦁ स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून मीडिया फ्युजन कंपनी , मरीन लाईन्स ,मुंबई मध्ये काम केले आहे . वर्ष२००९ ते २०१०.
⦁ स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून विस्तास डिजिटल मीडिया मालाड , हनुमान, गणेश, कृष्ण आणि भागवत गीता ९० मिनिट्स चे स्टोरीबोर्ड केले आहेत . वर्ष २०१० ते २०१२
⦁ फ्रीलान्सर स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून शिक्षा ऍनिमेशन स्टुडिओ क्रीएटिव्ह किड्स चॅनेल साठी काम केले आहे . वर्ष २०१२ ते २०१८
⦁ स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून आय एंटरटेनमेंट कांदिवली मुंबई येथे काम केले आहे . वर्ष २०१६.
⦁ स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून आयरिऍलीटीस कंपनी, माहीम 2016 .
⦁ युटयूब चॅनेल साउंडट्रॅक किड्स ,नेपाळी चॅनेल आणि चूल बुल टी व्ही हिंदी चॅनेल साठी स्टोरीबोअर्डींग आणि ऍनिमेशन दिले आहे .
⦁ स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून एकेसी हब ऍनिमेशन स्टुडिओ अंधेरी 2019
⦁ सिनीयर स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून आयकास्टएक्स टेकनॉलॉजि कंपनी , अंधेरी 2019 ते 2020 .
पोर्ट्रेटस
रामायण पैंटिंग्स
निसर्गचित्र
ऍबस्ट्रॅक्ट
ट्रॅडिशनल पैंटिंग्सकाही निवडक चित्रकलाकृती




















