सीमा गोंडाणे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
मुंबईच्या प्रसिद्ध मुद्राचित्रकार (प्रिन्टमेकर) सीमा गोंडाणे यांनी साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन विश्वविख्यात जहांगीर कलादालनात २० डिसेंबरपासून सुरु आहे. या प्रदर्शनातील कलाकृतींचा आस्वाद २६ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलारसिकांना घेता येणार आहे.

प्रिन्टमेकर सीमा गोंडाणे यांनी बॅचलर ऑफ फाईन आर्टचे शिक्षण नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयात घेतले असून, मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टस या प्रतिष्ठित संस्थेतून डिप्लोमा इन आर्टस् एज्युकेशन आणि फाईन आर्ट्सची मास्टरी मिळवली आहे. नागपूर, मुंबई, नवी दिल्लीच्या कलादालनांत भरलेल्या अनेक समूह प्रदर्शनांत सीमा यांच्या कलाकृतींनी प्रतिनिधित्व केले आहे. वेगवेगळ्या कला कार्यशाळांत त्या सहभागी झाल्या आहेत. अनेक प्रतिष्ठेच्या कला पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
आंतरिक विचाराचा धागा जोडून साकारलेल्या कलाकृतींचे हे प्रदर्शन त्यांच्या कलाप्रवासातील महत्वाचा टप्पा आहे.