रेखाटले लता मंगेशकर यांचे अप्रतिम स्केच
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. या स्पर्धकांमधीलच एक जिने आपल्या सुमधुर गायकीने, सुरांनी प्रेक्षकांना आपलेसे केले आहे अशी सगळ्यांचीच लाडकी शरयू दाते ही गाण्याबरोबरच उत्तम चित्रदेखील काढते. या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या भागामध्ये शरयूने भारतरत्न लता दीदी यांचे काढलेले एक सुंदर स्केच प्रेक्षकांना दाखवले. या व्यतिरिक्त तिने तिच्या गुरु आरती अंकलीकर यांचे स्केचदेखील काढले आहे.

शरयूला चित्रकला खूप आवडत असून तिने त्याच्या संबंधीतील परीक्षेमध्ये “A” Grade मिळवला आहे. “गाण्याबरोबरच मला चित्रकला, स्केच काढयला खूप आवडते. मला जसा वेळ मिळेल तसं मी चित्र काढते. सध्या मला तितकासा वेळ नाही देता येतं. पण माझा नेहेमीच प्रयत्न असतो वेळ देण्याचा” असं शरयू म्हणाली.
शरयूने सूर नवा कार्यक्रमामध्ये अनेक सुंदर गाणी गाऊन कॅप्टनसची आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण, ‘आपला मानूस’ चित्रपटासाठी नुकतेच नाना पाटेकर हे या कार्यक्रमामध्ये येऊन गेले तेंव्हा तिने सादर केलेले ‘सहेला रे’ हे किशोरी आमोणकर यांचे गाणे गाऊन तिने नानांचे मन जिंकले होते. शरयूची तसेच बाकीच्या स्पर्धकांची अशीच सुंदर गाणी ऐकण्यासाठी बघत रहा ‘सूर नवा ध्यास नवा’ सोम ते बुध रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.