‘शौर्य – गाथा अभिमानाची’
८०च्या काळात अत्यंत गाजलेली ‘अमीरजादा केस’ झी युवा या वाहिनीवरील ‘शौर्य – गाथा अभिमानाची’ या कार्यक्रमधील पुढील स्टोरी आहे. एक अत्यंत हुशार, जवाबदार आणि कर्त्यव्यदक्ष पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी ज्याप्रकारे ह्या केसचा मागोवा केला आणि कोर्टात शौर्याने मारेकऱ्याला पकडले हे सर्व अकल्पनीय आहे.

अमीरजादा केस गाजली कारण भरकोर्टात न्यायमूर्तींच्या डोळ्यादेखत अमीरजादावर डेव्हिड या मारेकऱ्याने बंदुकीने घातलेल्या गोळ्या आणि त्यांनतर मारेकऱ्याला पकडताना बागवान यांनी दाखवलेलं प्रसंगवधान, हे थरार नाट्यसुद्धा मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासातील पहिली घटना होती. भर कोर्टातुन जर मारेकरी पळून गेला असता तर पोलीस खात्याचीच नव्हे तर न्यायदेवतेची अब्रूसुद्धा वेशीवर टांगली गेली असती. अशी ही कथा झी युवा वर दाखवण्यात येणार आहे.
कर्तव्यदक्ष आणि धाडसी महाराष्ट्र पोलिसांच्या अश्याच वेगवेगळ्या शौर्यगाथा आपल्याला झी युवावर, शौर्य – गाथा अभिमानाची या कार्यक्रमाद्वारे पहायला मिळणार आहे.
इसाक बागवान यांनी अनुभवलेला हाच थरार, त्यांनी केलेलं हेच शौर्य या आठवड्यात येत्या शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९ वाजता पुन्हा झी युवावर अनुभवू शकणार आहात.
‘शौर्य – गाथा अभिमानाची’ या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंटचे सचिन मोहिते, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.